प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मागणीला आले यश पत्रकारांची होणार अँटीजेन टेस्ट

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मागणीला आले यश


पत्रकारांची होणार अँटीजेन टेस्ट


महाराष्ट्र 24 आवाज


नवी मुंबई(महेश कदम) प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नवी मुंबई महानगरप्रमुख संपादक सुदिप घोलप यांनी दि.17/ जुलै/ 2020 रोजी अतिरिक्त आयुक्त जनसंपर्क विभाग, नवी मुंबई , मनपा यांना ईमेलद्वारे निवेदन दिले होते त्या निवेदनाची दखल घेऊन नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व पत्रकार, व्हिडीओ जर्नालिस्ट व फोटो जर्नालिस्ट यांची मोफत अँटीजेन टेस्ट नवी मुंबई मनपा मार्फत केले जाणार आहे.



प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नवी मुंबई तर्फे मागणी करण्यात आल्याप्रमाणे, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वृत्तांकन करणारे (परंतु, ज्यांच्याकडे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र वास्तव्याचा पुरावा आहे) असे सर्व पत्रकार, व्हिडीओ जर्नालिस्ट, फोटो जर्नालिस्ट यांची 'अँटीजेन टेस्ट' मोफतपणे करण्याची महानगरपालिकेने विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. तरी, वास्तव्याचा पुरावा आणि पत्रकारितेचे अधिकृत ओळखपत्र सोबत घेवून सर्व पत्रकार, व्हिडीओ जर्नालिस्ट, फोटो जर्नालिस्ट इत्यादींनी सोमवार दि. 20 जुलै ते गुरुवार 30 जुलै दरम्यान सकाळी 11.00 वा. ते दुपारी 1.00 वा. दरम्यान आपली अँटीजेन टेस्ट करून घ्यावी असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नवी मुंबई महानगरप्रमुख सुदिप घोलप यांनी पत्रकारांना आवाहन केले आहे.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image