पावसाच्या दमदार आगमनामुळे बळीराजा सुखावला. पुरेशा प्रमाणात पाणी झाल्याने शेतकऱ्यांची लावणीला सुरुवात.

पावसाच्या दमदार आगमनामुळे बळीराजा सुखावला.


पुरेशा प्रमाणात पाणी झाल्याने शेतकऱ्यांची लावणीला सुरुवात.


महाराष्ट्र 24 आवाज



(तळा श्रीकांत नांदगावकर) आषाढी एकादशीपासून  पावसाने जोरदार बरसने सुरू केल्याने बळीराजा सुखावला असून शेतात पुरेशा प्रमाणात पाणी झाल्याने शेतकऱ्यांनी लावणीला सुरुवात केली आहे.जून महिन्याच्या सुरुवातीस हजेरी लावलेल्या पावसाने अचानक दडी मारल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला होता पाण्याअभावी दुबार पेरणीचे संकट बळीराजावर ओढवल होत.मात्र आषाढी एकादशीला जणू पांडुरंगाने बळीराजावर आलेले संकट दूर केल्या प्रमाणे जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या शेतात भरपूर प्रमाणात पाणी झाल्याने तळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह शेती लावणीला सुरुवात केली आहे.आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पावसाचे आगमन झाल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासाठी पांडुरंगच धावून आल्याचे समाधान बळीराजाच्या चेहऱ्यावर उमटले.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image