अहमदपूर तालुक्यात हरणाचा सुळसुळाट
महाराष्ट्र 24 आवाज
अहमदपूरः महादेव सुधाकर महाजन
म्हणतात ना कोणी नाही सापडला पण शेतकरी सापडला देवाला पण व्यापाऱ्याला पण पशू प्राण्यांना पण प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यावर अस्मानी संकट ? शेतकऱ्यांनी जगावे की मरावे ? हा प्रश्नच
या वर्षांमध्ये तर सुरुवातीला कोरोनाने परेशान केले त्यानंतर व्यापारी लोकांनी बोगस बियाणे दिली त्यातून पण आशेवर शेतकरी दुबार पेरणी करून जगत असतांना आता कुठे शेतानी हिरवी चादर पांघरली असताना त्या पिकांना हरीण व अन्य वन्य प्राण्यांचा ञास चालू आहे
एका कळपात जवळपास 70 ते 80 हरीण आहेत हे ज्या वेळेस एखाद्या वावरात जातील तेव्हां त्या शेतकऱ्यांनी करावे काय हा प्रश्न शेतक-यांना सतावतो आहे.
या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाली कोण आहे ? या समस्यांना उत्तर कोण देणार आहे ? या हरणामुळे बळीराजा संकटात सापडला असून यावर काय उपाययोजना करता येईल या प्रश्नांने शेतकरी चिंतातूर आहेत.