अशोक कासे यांच्या गाडीचा किरकोळ अपघात
महाराष्ट्र २४ आवाज
माणगाव (अशोक कासे) बहुजन समाज पार्टी माणगाव तालुका अध्यक्ष व दलित पँथर रायगड जिल्हा उपाध्यक्ष अशोक मारूती कासे, यांच्या गाडीचा किरकोळ अपघात झाला असून हाती आलेल्या माहितीनुसार दिनांक ८/७/२० रोजी सकाळी ११:३० च्या दरम्यान अशोक कासे हे माणगाव वरून आपल्या घरी जात असतांना त्यांच्या गावातून भरधाव वेगाने येणार्या अज्ञात दुचाकी स्वराने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला असून, अपघातात त्यांना डोळ्यांवर मार लागल्याने खोल जखम झाली आहे. त्यांना रुग्णालयात उपचार घेऊन त्यांच्या जखमेवर १० टाके घालून घरी सोडण्यात आले, चौकशी केली अंती समोरील दुचाकी स्वार हा शेजारील गाव (मुंडेवाढी)़येथील असून तिलोरे गावचे रहिवासी सादु घारू ढाकवल यांचे होणारे जावई असल्याचे समजते.