लातूर नवोदय विद्यालयात दहावीच्या निकालात अहमदपूरच्या साईनाथ मोर लवार याचे घवघवीत यश
महाराष्ट्र 24 आवाज
प्रतिनिधी - महादेव महाजन
अहमदपूर : लातूर जवाहर नवोदय विद्यालय येथील 2019 -20 चा सीबीएसई दहावीचा निकाल आज दिनांक 15 7 2020 रोजी लागला तर त्यामध्ये अहमदपूर येथील चि. साईनाथ संतोष मोरलवार यांनी 98.40% घेऊन त्याने विद्यालयाचे व अहमदपुर चे नाव रोशन केले आहे
लातूर नवोदय नवोदय विद्यालयाचा रिझल्ट शंभर टक्के लागला असून त्यात 90 टक्के याच्यावर 78 पैकी 22 विद्यार्थी आहेत तर 100 पैकी 100 गुण अहमदपूरचे गणू सिंग ठाकूर सर यांच्या मार्गदर्शनाखाली गणितामध्ये तब्बल सात विद्यार्थ्यांनी बाजी मारलेली आहे तसेच शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विषय मध्ये एका विद्यार्थिनीने 100 पैकी 100 गुण मिळवलेले आहे त्यामुळे नवोदय विद्यालयाचे व प्राचार्य रमेश राव सर व उपप्राचार्य रामू सर तसेच सर्व शिक्षक वृद्धाचे अभिनंदन करण्यात येत आहे.