तळा येथे नव्याने दोन कोरोना पाॅझिटीव्ह
एकूण संख्या २०
पोलीस कुटुंब बाधित निघाल्याने खळबळ,परीसर सिल
महाराष्ट्र २४ आवाज
तळा (किशोर पितळे) रायगड जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून शहरापासून ग्रामीण भागासह खेड्यात देखील पसरला आहे. प्रत्येक तालुका सुटलेला नाही आज तळा तालुक्यात नव्याने २ कोरोना रूग्ण आढळून आले असून तळा पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई कोरोना बाधित ८ जुलै रोजी आढळून आले होते त्यामुळे खळबळ उडाली होती. संपूर्ण पोलीस खात्यामध्ये टेंशन वाढत आहे. दिवसरात्र कोविंड १९ रोखण्यासाठी गेले तीन महीने कोविड योध्दा म्हणून कार्यरत असणारे पोलीस यांना लक्षणे दिसू लागल्याने माणगांव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान पत्नी व ८ महीन्याच्या बालकाची स्वॅब टेस्ट करण्यात आली होती त्यांंचे स्वॅब टेस्ट जे.जे. हाँस्पिटल येथे पाठवण्यात आले होते. सदर रिपोर्ट काल उशिरा प्राप्त झाले असून दोघांचाही पाॅझिटीव्ह रिपोर्ट आला असून माणगांव लोणेरे येथे कोविड सेंटर मध्ये उपचार सुरु आहेत. शहरातील परीट आळी येथील वास्तव्यात असलेला दिलिप तळेकर यांच्या घरापासून संतोष तळेकर यांच्या घरापर्यंतचा परिसर (सिल) केला आहे व कंटेन्मेंटझोन जाहीर करण्यात आला आहे.
प्रशासन अधिक सक्रिय झाले आहे. नगरपंचायतीकडून प्रतिबंधात्मक सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली आहे. शहरात कोरोना प्रतिबंध करण्यासाठी
जनजागृती अलाऊन्समेंंट करण्यात येत आहे.
नगरपंचायत हद्दीत चार रूग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. सद्यस्थितीत २० कोरोना रूग्णापैकी १४ ठणठणीत बरे झाले असून २ मृत पावले तर ४ उपचार घेत असून एकूण २० संख्या झाली आहे. अशी माहिती तळा तहसील कार्यालयातून प्राप्त झाली असून प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे तंतोतंत पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.