किंग्ज ग्रुप महाराष्ट्रच्या कोकण प्रदेश अध्यक्षपदी नाझिया सुबेदार-बाथम यांची निवड
महाराष्ट्र 24 आवाज
उपसंपादक - समीर बामुगडे
रोहे :- भारत व विदेशात सक्रिय सामाजीक कार्यात अग्रेसर "किंग्ज गृप" या संघटनेच्या कोकण प्रदेश अध्यक्ष पदावर नाझिया सुबेदार-बाथम यांची नियुक्ती झाल्याची घोषणा किंग्ज गृपचे संस्थापक अध्यक्ष प्रतिक पाटेकर यांनी केली. किंग्ज गृप मुंबई महाराष्ट्र राज्यासह आखाती देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर झपाट्याने कार्यरत एक दणकेबाज सामाजिक संघटना आहे. रंजल्या गांजल्याना मदत करणे,अडीअडचणीत असलेल्याना सहकार्य करणे तसेच सर्व सामाजीक कार्यात पुढाकार घेऊन जनसामान्यांना सहकार्य करणे हे संघटनेचे मुळ ब्रिद आहे. नाझ सुबेदार-बाथम या " हम हिंदुस्तानी" या त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून गेली काही वर्षे रायगड जिल्ह्यात असेच कार्य करत आहेत.किंग्ज गृपचे महाराष्ट्र राज्य रफिक नेकवारे यांनी त्यांचे कार्य पाहुन संघटनेमधे त्यांना कोकण प्रदेशची जबाबदारी द्यावी अशी मागणी केली.त्याबाबत संघटनेच्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पदाधिकारींची सविस्तर चर्चा झाली आणि एकमुखाने सर्वांनी नाझ सुबेदार-बाथम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
मला किंग्ज गृपच्या माध्यमातून मला मोठ्या व्यासपीठावर कार्य करण्याची सुसंधी मिळाली आहे हे माझे खरेतर भाग्य आहे.संघटनेचे राज्य पातळीवरचे अध्यक्ष प्रतिक पाटेकर,राज्य संपर्क प्रमुख रफिक नेकवारे,राज्य संघटक प्रतिक सकपाळ दीपक पहुरकर मुंबई प्रतिनिधी मयुरेश माणगावकर यांना अभिप्रेत कार्य कोकणात उभे करण्यास माझी प्राथमिकता राहील.कोकणात जनसामान्य खुप अडचणीत असतात.नैसर्गिक आपत्ती असो किंवा सरकारी मदत कोकणी माणूस नेहमीच नाडला जातो.त्यामुळे त्यांचे न्यायहक्क कायदेशीर मार्गाने त्यांना मिळवुन देण्यासाठी मी सतत जागृत राहीन असे अभिवचन नाझीया सुबेदार-बाथम यांनी व्यक्त केले आहे.