महिलेसोबत अश्लील प्रकार घडवून आणणाऱ्या नराधमास जनतेने चोप द्यावा
बडनेरा रुग्णालयातील अनुचित प्रकार
कोरोना चाचणी करण्याच्या नावाखाली केला अमानुष प्रकार
त्या नराधमाने कोरोना साठी घेतली युरिनल स्लॅब चाचणी
महाराष्ट्र 24 आवाज
जिल्हा प्रतिनिधी- गजानन हुरपडे
अमरावती बडनेरा येथील ड्रमकीय सेंटिंग लॅब मध्ये काम करणाऱ्या लॅब टेक्निशियनने एका तरुणीस पॉझिटिव्ह असल्याचे सांगून पॉझिटिव्ह पुनः चाचणी साठी बोलावले व तिच्या प्रायव्हेट पार्ट मधील स्लॅब घेऊन ती निगेटिव्ह असल्याचे सांगितले. त्या तरुणीस संशय येताच आपल्या भावाला तीन हा प्रकार सांगितला ज्यावरून चौकशी अंती अशी कोणतीही चाचणी नसते असे माहिती मिळताच बडनेरा पोलीस स्टेशनं गाठून तक्कार दाखल केली. ज्यावरून पोलिसानी अल्पेश अशोक देशमुख वय तीस वर्ष ह्यास अटक करून त्यावर भादंवि 376, ऍट्रॉसिटी, आय. टी. ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
अमरावती येथे मॉल मध्ये काम करणाऱ्या 24 वर्षीय तरुणी जिला थ्रोट स्लॅब घेण्यासाठी नेण्यात आले होते. मॉल मधील एक व्यक्ती पॉझिटिव्ह झाल्याने त्या मॉल मधील काम करणाऱ्या वीस लोकांना कॉरंटाईन करण्यात आले होते. ज्यांचा थ्रोटस्लॅब घेण्यात आला मात्र ह्या तरुणीस पुनः तपासणी साठी बोलावून तिच्यावर हा अन्याय अत्याचार करण्यात आला.
महिलांवर अत्याचार सहन केल्या जाणार नाही... यशोमती ठाकूर
अमरावती हा भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीचे शहर आहे. ह्या शहरात महिलांवर अत्याचार सहन केले जाणार नाहीत. अशा प्रकारचा धक्कादायक प्रकार शहरात घडला आहे. त्याचेवर कायद्यान्व्ये कार्यवाही झाली असून ह्यापुढे कोणीही अशी हिम्मत करणार नाही.
यशोमती ठाकूर
पालक मंत्री अमरावती