उद्या एक वाजता जाहीर होणार दहावीचा निकाल.
विद्यार्थ्यांमध्ये वाढली निकालाची धडधड
या वेबसाईटवर पाहता येईल निकाल
महाराष्ट्र २४ आवाज
(तळा श्रीकांत नांदगावकर) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये निकालाची धडधड वाढली आहे.
दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर केला जात असे मात्र यंदा जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्यास अनेक अडचणी आल्याने दरवर्षी पेक्षा एक महिना उशिराने दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. आयसीईएसई आणि सीबीएसई तसेच राज्य मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याकडे विद्यार्थी व पालक वर्गांचे लक्ष लागले होते. अखेर उद्या २९ जुलै रोजी ऑनलाइन पध्दतीने दुपारी १.०० वा. दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार असून विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.तसेच त्यांना निकालाची प्रत सुद्धा घेता येणार आहे.