आ. अनिकेत तटकरे यांची तळा प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट तहसिल कार्यालयात घेतली आढावा बैठक

आ. अनिकेत तटकरे यांची तळा प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट 


 तहसिल कार्यालयात घेतली आढावा बैठक


महाराष्ट्र २४ आवाज


प्रतिनिधी - सुरेंद्र शेलार


३ जून २०२० रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामध्ये तळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मोठे नुकसान झाले असून आ. अनिकेत तटकरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून नुकसान झालेल्या भागाचे बांधकाम सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल असे सांगितले.



तसेच रूग्णांच्या सेवेबद्दल चौकशीही केली. त्यानंतर तहसिल कार्यालयात आढावा बैठक घेऊन वीज, पाणी, आपदग्रस्तांची मदत, आरोग्य अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली. तहसिलदार श्री अण्णप्पा कनशेट्टी, नायब तहसिलदार श्री खरोडे, तळा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.रेश्माताई मुंढे, मुख्याधिकारी माधुरी मडके, पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री यादव, पंचायत समिती सभापती सौ. देवकी लासे नगरसेवक यांच्या समक्ष आढावा बैठक घेण्यात आली. तसेच तळा अभियंता पानसरे यांनी आढावा बैठकीमध्ये वीज पुरवठा काम पाभरे फिडर पासून मजगाव पर्यंत पूर्ण झाले असून लवकरच तळा तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत होईल, तसेच येत्या २ ते ३ दिवसात तळा शहराला जेथून पाणी पुरवठा होतो त्या आंबेळी पंपहाऊस येथे वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन आढावा बैठकीत दिले.



या आढावा बैठकीमध्ये उपनगराध्यक्षा सौ.सायलीताई खातू,पाणी पुरवठा सभापती सौ.नेहा पांढरकामे, नगरसेवक चंद्रकांत रोडे, रवींद्र मुंढे, प्रकाश गायकवाड, चांदिवकर, वैद्यकीय अधिकारी अमोल बिरवाटकर, पत्रकार दिलीप मुळे, नमित पांढरकामे, महाराष्ट्र् २४ आवाजचे पत्रकार सुरेंद्र शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image