अहमदपुर प.स.च्या गटविकास अधिका-यावर अविश्वास ठराव दाखल
महाराष्ट्र २४ आवाज
प्रतिनिधी- महादेव महाजन
अहमदपूर येथील पंचायत समीतीचे गटविकास आधिकारी भागवत ढवळशंख यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे . त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे .
सभापती गंगासागर जाभाडे, उपसभापती बालाजी गुट्टे यांच्यासह आठ सदस्यांनी गटविकास अधिकारी ढवळशंख यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून त्यांच्यावर आठ विरुद्ध शुन्या मताने अविश्वास ठराव मंजूर करून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्याकडे पाठवून त्यांच्या कारभाराची विभागीय चौकशी करून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे.सरपंचांना कामाची टक्केवारी मागणे,सभापती उपसभापती व सदस्यांना विश्वासात न घेणे ग्रामसेवकांना व सरपंचांना वेठीस धरून त्यांच्याकडून भरमसाठ पैशाची मागणी करणे, असे गंभीर आरोप सभापती व उपसभापती ने केली आहेत. याबाबत गटविकास अधिकारी ढवळशंख यांनी बोलण्यास नकार दिला.