शेतकऱ्यांच्या खरीप पीक विम्याचे पैसे सरकारनेच भरावे.
- शेतकरी पत्रकार व्यंकटराव पनाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
महाराष्ट्र २४ आवाज
जिल्हा प्रतिनिधी- व्यंकटराव पनाळे
लातुर : लातूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वसामान्य जनता आणि शेतकरी वर्ग भीतीग्रस्त अवस्थेत आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी पिक विमा भरण्यासाठी वेगवेगळ्या बँकांच्या समोर गर्दी करून करोनाचा संसर्ग पसरवण्यास मदत केल्यासारखेच होईल. सध्या हा शेतकरी सर्वार्थाने नागवला गेलेला आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णतः बिकट झालेली आहे. विशेषतः लातूर जिल्ह्यात सोयाबीनच्या दुबार तिबार पेरणी मुळे शेतकऱ्यांचे कंबरडे पूर्णतः मोडले आहे. खरिपाचा पिक विमा भरायला सुद्धा शेतकरी आर्थिक दृष्ट्या संपूर्णतः अडचणीत सापडला आहे. तेव्हा महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांचा खरीप पिकाचा विमा महाराष्ट्र शासनानेच भरावा अशी मागणी शेतकरी व ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र सरकारने विमा भरल्यास कुठल्याही शेतकऱ्याला बँकेसमोर जाण्याची गरज भासणार नाही आणि बँक यंत्रणेवर ही ताण पडणार नाही. तलाठी कार्यालयाकडे सर्व शेतकऱ्यांच्या पीकपेऱ्यांच्या नोंदी आहेत. तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यामार्फत सर्व शेतकऱ्यांचे खरीप पीक विम्याचे कागदपत्रे भरून घ्यावीत अशीही मागणी व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या साठी महाराष्ट्र सरकारने एक पॅकेज देऊन आर्थिक मदत करावी. आणी वाटल्यास शेतकऱ्यांना पॅकेज देताना शेतकऱ्यांचा खरिपाचा पिक विमा भरलेली रक्कम त्यातून सरकारने कपात करून घ्यावी अशीही मागणी व्यंकटराव पनाळे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
शेतकऱ्यांच्या विषयी उगीच पुतनामावशीचे प्रेम दाखवण्या ऐवजी प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांना मदत करून खऱ्या अर्थाने ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना आधार द्यावा असे आव्हान व्यंकटराव पनाळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केले आहे.
- व्यंकटराव पनाळे, मुक्तपत्रकार
९४२२०७२९४८