प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाकडून डॉ. संदीप शिंदे यांचा 'कोविड योद्धा' सन्मानपत्राने गौरव
महाराष्ट्र २४ आवाज
खालापूर/ संतोष शेवाळे - वावोशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप निवृत्ती शिंदेआणि त्यांचे सहकारी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल प्रेस संपादक व पत्रकार संघाकडून त्यांना कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
यावेळी प्रेस संपादक व पत्रकार संघाचे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष शेवाळे, गोरठणचे माजी सरपंच सीताराम पाटील, जेष्ठ नागरिक सुभाष पाटील, माजी उपसरपंच शशिकांत पाटील, शिवकृपा मेडिकलचे मालक मिलिंद पाटील, शिरवली गावचे उपसरपंच सदानंद मोरे, पत्रकार राजू भंडारी ,डॉ. सीमा पाईकराव, वैद्यकीय कर्मचारी भाऊलाल राठोड, नाझ शेख, अंगणवाडी सेविका जयश्री पाटील आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या या महामारीमध्ये स्वतः च्या जीवाची पर्वा न करता आपले जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा फक्त आपले कर्तव्य म्हणून न निभावता माणुसकी म्हणून निभावत आहेत व मानव सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून कार्य करीत असलेले डॉ. संदीप शिंदे यांच्या कार्याची दखल घेऊन पत्रकार संघाने त्यांना कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आले आहे.
सध्याच्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उल्लेखनीय सामाजिक कार्य करीत असलेल्या व्यक्तींना प्रेस संपादक व पत्रकार संघाकडून त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी 'कोरोना योद्धा' सन्मानपत्राने गौरविण्यात येत असून यामध्ये वावोशी पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस हवालदार जे पी म्हात्रे, स्वराज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रमोद शिर्के यांनाही कोविड योद्धा सन्मानपत्र जाहीर करण्यात आले आहे.