पत्रकार समीर बामुगडे यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान

पत्रकार समीर बामुगडे यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान  


महाराष्ट्र 24 आवाज  


                                                                                        गोवे -कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील निवी गावचे पत्रकार समीर रामा बामुगडे यांचा मौलाना आझाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बीड यांच्या वतीने कोविड युद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. समीर बामुगडे हे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या कोकण विभागाच्या कार्यध्यक्ष पदावर कार्यरत असुन ते गेले १५ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून त्यांनी जनतेचे निर्भीडपणे सामाजिक प्रश्न सोडविले आहेत. याच बरोबर त्यांनी कोविड १९ आपत्ती काळात रोहा तालुक्यात समाजासाठी प्रत्येक ठिकाणी जाऊन जिवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र केलेल्या कार्याबद्दल समीर बामुगडे यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.



यावेळी मौलाना आझाद बहुउद्देशीय सेवा भावी संस्था बीडचे अध्यक्ष अँड.सय्यद अजीम, कार्याध्यक्ष शेख कासीम, सचिव सय्यद मिनहाजोद्दिन, उपसचिव मिर्झा मोईज बेग व सर्व सदस्य उपस्थित होते. उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image