कु. राजरत्नेश संतोष गायकवाड इ.१२ कला शाखेमध्ये तालुक्यात प्रथम

कु. राजरत्नेश संतोष गायकवाड इ.१२ कला शाखेमध्ये तालुक्यात प्रथम 


महाराष्ट्र २४ आवाज


तळा (सुरेंद्र शेलार) बौद्धजन पंचायत समिती ता.तळा माजी अध्यक्ष आणि बहुजन समाज पार्टी श्रीवर्धन विधानसभा माजी अध्यक्ष सन्मानिय श्री. संतोष गोविंद गायकवाड यांचे सुपुत्र कुमार राजरत्नेश संतोष गायकवाड रा.खांबवली ता.तळा,जि.रायगड, या विद्यार्थ्यांने त्याच्या आईवडिलांच्या कष्टाचे चीज करून आणि स्वतः अभ्यासात मेहनत घेऊन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळा या महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता १२ वी मध्ये कला शाखेतून ६४% गुण मिळवून तळा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा सन्मान प्राप्त केला आहे.



कु.राजरत्नेश संतोष गायकवाड हा बौद्ध समाजातील विद्यार्थी असून त्याने आपल्या समाजाचे नाव आणि आपल्या खांबवली गावाचे नाव तसेच आपल्या महाविद्यालयाचे नाव व शिक्षकांचे नाव रोशन करुन नावलौकिक प्राप्त केला आहे.


कोरोनाच्या आलेल्या या महामारीच्या संकटाला संपूर्ण देश तोंड देत असतांना त्यात प्रत्येक परीक्षार्थीला व पालक वर्गाला निकालाची प्रतिक्षा होती. या चिंतेत सर्वजण होते परंतु ज्यावेळी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षणमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांनी निकालाच्या तारखेची घोषणा केल्यावर विद्यार्थी वर्गाने आणि पालक वर्गाने सुटेकेचा निःश्वास टाकला.


१६ जुलै २०२० रोजी निकाल लागल्यानंतर संपूर्ण गायकवाड कुटूंबात आनंदाचे वातावरण पसरले होते. 


नातेवाईक, सगेसोयरे, मित्रपरिवाराने मोबाइलच्या माध्यमातून संपर्क करून राजरत्नेश याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.


प्रेस संपादक व पत्रकार सेवासंघ महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र २४ आवाज यांच्या वतीने राजरत्नेश याचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image