ज्ञानसत्ता प्राप्ती व शिक्षण जागृती अभियानाचे उद्घाटन संपन्न विद्यार्थ्यांनी परिस्थितीचा बाऊ न करता गुणवत्तापूर्ण शिक्षणातील प्रत्येक पायरी यशस्वीपणे गाठण्यासाठी सातत्याने सकारात्मक पुढाकार दर्शविला पाहिजे....! डॉ.कैलास गायकवाड

ज्ञानसत्ता प्राप्ती व शिक्षण जागृती अभियानाचे उद्घाटन संपन्न


 


विद्यार्थ्यांनी परिस्थितीचा बाऊ न करता गुणवत्तापूर्ण शिक्षणातील प्रत्येक पायरी यशस्वीपणे गाठण्यासाठी सातत्याने सकारात्मक पुढाकार दर्शविला पाहिजे....!


 डॉ.कैलास गायकवाड


महाराष्ट्र 24 आवाज


प्रतिनिधी - सविता वाघमारे



मानसिक पातळीवरील गुलामगिरीचा नायनाट करण्यासाठी परिवर्तनवादी शिक्षण नावाच्या वाघिणीचे दूध प्राशन करून अहोरात्र ज्ञान प्राप्तीसाठी झटले पाहिजे.माणसाच्या संपुर्ण विकासासाठी आणि त्याच्या मुलभूत अधिकारांसाठी ज्ञानसत्ता सर्व सत्तांचे मूळ आहे.



 प्रा.प्रकाश नाईक


बहुजन नायक अण्णा भाऊ साठे जन्म शताब्दीनिमित्त ज्ञानसत्ता प्राप्ती व शिक्षण जागृती अभियाना अंतर्गत आज आज दि.७ रोजी ऑनलाईन व्याख्यानमालेचे पहिले पुष्प अतिशय उत्साहात गुंफले गेले.


याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ.कैलास गायकवाड (IRS) [अतिरिक्त आयुक्त,आयकर विभाग,भारत सरकार] तर प्रमुख 


मार्गदर्शक म्हणून प्रा.प्रकाश नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.किरणकुमार मनुरे तर सुत्रसंचालन संयोजन समितीचे प्रदीप वाघमारे यांनी केले.कार्यक्रमात जवळपास ७८ विद्यार्थ्यी आणि पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता.


विद्यार्थ्यांनी परिस्थितीचा बाऊ न करता गुणवत्तापूर्ण शिक्षणातील प्रत्येक पायरी यशस्वीपणे गाठण्यासाठी सातत्याने सकारात्मक पुढाकार दर्शविला पाहिजे....!


 


 डॉ.कैलास गायकवाड सर.


 


कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.कैलास गायकवाड सर यांनी मार्गदर्शनपर भाषणात बोलतांना म्हटले की,गरिबी आहे आणि संसाधने नाही म्हणून परिस्थितीचा बाऊ न करता अनुकूल परिस्थिती मध्ये आहे त्या संसाधनांचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी जिद्द,मेहनत,चिकाटी आणि आत्मविश्वास बाळगून गुणवत्तापूर्ण शिक्षणातील प्रत्येक पायरी यशस्वीपणे गाठण्यासाठी सातत्याने सकारात्मक पुढाकार दर्शविला पाहिजे.


शिक्षण हे सर्व मानवी उन्नतीचा पाया आहे म्हणून आपले शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे.


शिक्षणाचे खरे महत्त्व समाजात रुजलेच नाही.त्यासाठी आपण स्वतः कारणीभूत आहोत.आपण केवळ आपल्या प्राथमिक गरजा व उपलब्ध साधन साम्रगीपर्यंत पोहचलो आहे.समाजातील शिक्षणातील उदासीनता समाजात असलेले प्रलंबित प्रश्न का निर्माण झाले आहेत या दशेची कारणे शोधण्यासाठी आपण वेळ दवडत आहोत परंतु पर्याय म्हणून आज घडीला समाजाला योग्य दिशा मिळावी म्हणून आपण काय करू शकतो आणि काय केले पाहिजे याकरिता समाजात शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी शिक्षणाच्या कक्षा रुंदावल्या गेल्या पाहिजेत म्हणून समाजातील प्रत्येक व्यक्तीने सकरात्मकपणे संघटीत होत पुढाकार घेत विविध शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून कृतीयुक्त पाया उभारन्यात पुढाकार घ्यावा.असे आवाहन डॉ.कैलास गायकवाड यांनी केले.


मानसिक पातळीवरील गुलामगिरीचा नायनाट करण्यासाठी परिवर्तनवादी शिक्षण नावाच्या वाघिणीचे दूध प्राशन करून अहोरात्र ज्ञान प्राप्तीसाठी झटले पाहिजे.माणसाच्या संपुर्ण विकासासाठी आणि त्याच्या मुलभूत अधिकारांसाठी ज्ञानसत्ता सर्व सत्तांचे मूळ आहे......


प्रा.प्रकाश नाईक सर


दरम्यान व्यख्यानास प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्रा.प्रकाश नाईक सर ज्ञानसत्ता सर्व सत्तांचे मूळ आहे मार्गदर्शनपर या विषयावर बोलतांना म्हंटले की, 


युरोपात ज्ञानसत्तेच्या क्रांतीमुळे तिथल्या समाजजीवनात परिवर्तन घडत गेले.आधुनिक शिक्षणाचा विकास हा या प्रक्रियेचा एक भाग होता.ज्ञानसत्तेमुळेच नवनवीन शोध लागले.आणि त्या समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला गेला.


परंतु आपल्या देशात वर्षानुवर्षे परंपरागत चालत आलेल्या सनातन बुरसटलेल्या व्यवस्थेत शिक्षण ही उच्च वर्णीयांची मक्तेदारी होती आणि दलित म्हणून वेद प्रामान्यावर जगणारे बहुजन हे शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित होते.


तळागाळातील सर्वसामान्य बहुजनात ज्ञानसत्ता रूढ व्हावी याकरिता महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी राजे,क्रांतिसूर्य लहुजी साळवे महात्मा ज्योतिबा फुले,


सावित्रीमाई,छत्रपती शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी ज्ञानसत्तेसाठी लढा दिला आणि त्यांच्या अखंड प्रयत्नांतून शिक्षणाची दारे बहुजन समाजाला उघडली गेली.प्रामुख्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधानाने सर्वसामान्य उपेक्षितांना शिक्षणाचा हक्क अधिकार दिला.


विद्यार्थीं म्हणून आपण देखील मानसिक पातळीवरील गुलामगिरीचा नायनाट करण्यासाठी परिवर्तनवादी शिक्षण नावाच्या वाघिणीचे दूध प्राशन करून अहोरात्र ज्ञान प्राप्तीसाठी झटले पाहिजे.


कारण आपला वयक्तिक आणि सामाजिक सर्वांगीण विकास हा शिक्षणावरच अवलंबून असतो जो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो तो तितकाच यशाच्या शिखरावर जाऊन पोहचतो. शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपुर्ण विकासासाठी आणि त्याच्या मुलभूत अधिकारांसाठी महत्वाची असते.  


शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे तुमच्यातील जे काही सर्वोत्तम आहे ते प्रकट करणे म्हणजे खरे शिक्षण होय. सामाजिक,सांस्कृतिक,राजकी,आर्थिक आणि क्रीडा- कला क्षेत्रात आपला स्वतःचा,कुटुंबाचा आणि आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल आणि आपला प्रवास अधिक उत्कृष्टरित्या योग्य दिशेने करावयाचा असेल तर कोणत्याही परिस्थितीत शिक्षण मिळविण्यासाठी आपण सातत्याने कटिबद्ध असलो पाहिजे.असे मत प्रा.प्रकाश नाईक सर यांनी व्यक्त केले.


 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना प्रा.किरणकुमार मनुरे सर म्हटले की,ज्ञानसत्ता अभियाना अंतर्गत शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व्हावे विविध सामाजिक शैक्षणिक कल्याणकारी योजनांची चिकित्सक व अधिकृत माहिती विद्यार्थ्यांना मिळावी याकरीता मातंग समाजातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक जनजागृती करुन त्यांना शासकीय व निमशासकीय तसेच उच्चस्तरीय खाजगी क्षेत्रामध्ये प्रवेशाने मोक्याच्या व माऱ्याच्या जागा प्राप्त करण्याकरिता तसेच आपले ज्ञान व स्थान भक्कम करून विविध क्षेत्रातील प्रवेशाने आपला दबदबा व अस्तित्व निर्माण करण्याकरिता प्रामुख्याने सामूहिकतेने हा अभियान हाती घेण्यात आलेला आहे.


 


याकरिता आपल्या समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तळमळीच्या तज्ञ,उच्चपदस्थ, ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्वास या शैक्षणिक जनजागृती अभियानात आमंत्रित करून ऑनलाइन स्वरूपात झूमच्या माध्यमातून संवादाद्वारे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक क्षेत्राबद्दल जागृत व प्रवृत्त करण्यासाठी हा सदर अभियान हाती घेण्यात आलेला आहे.या अभियानात जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी सहभागी होऊन माहितीच्या आदान-प्रदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन ज्ञानसत्ता प्राप्ती संयोजन समितीच्या वतीने प्रा.किरणकुमार मनुरे यांनी केले.


 


            शब्दांकन


          संतोष रणबावळे


संयोजन समिती, ज्ञानसत्ता अभियान


••••••••••••••••••••••••••••••••••••••••


     


 


 Coming soon 


 


          ज्ञानसंवाद पुष्प-२


 


🔖 विषय- कृषी व संलग्न क्षेत्रातील करिअरच्या संधी.


 


🔖 मार्गदर्शक- 


*डॉ.व्ही.व्ही.सदामते*


(माजी मुख्य सल्लागार,केंद्रीय कृषी मंत्रालय व नोयजन आयोग भारत सरकार) 


 


*डॉ.गोवर्धन खंडागळे*


(माजी संशोधन संचालक,वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ,परभणी) 


 


*डॉ.विठ्ठल शिर्के* 


(संचालक,महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद)


 


*दिनांक- 9 जुलै सायं-6:00 वाजता*


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image