तळा बाजारपेठेत ६ ते ११ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू.
महाराष्ट्र २४ आवाज
(तळा श्रीकांत नांदगावकर) तळा बाजारपेठेत रविवार पासून ६ ते ११ या वेळेत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू करण्यात आली. प्रशासनाकडून अचानकपणे १६ जुलै ते २६ जुलै दरम्यान पुरणतः लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने लहान मोठे उद्योग करणाऱ्या व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. प्रशासनाच्या बारा दिवस लॉकडाऊन करण्याच्या निर्णयाविरुद्ध अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर तीन दिवसानंतर मा.जिल्हाधिकारी अलिबाग यांनी लॉकडाऊन मध्ये शिथिलता आणत रविवार पासून सकाळी६ ते११ या वेळेत किराणा, भाजीपाला, मटण,चिकन, मच्छी,दूध,फळ विक्रेते यांना दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला.
रविवारी गटारी असल्याने चिकन विक्रेते,खाटीक व भाजी विक्रेते यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या दुकानात माल भरला होता.लॉकडाऊनमूळे या सर्वांचे मोठे नुकसान होणार होते मात्र जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊन मध्ये शिथिलता करून ६ ते ११ यावेळेत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिल्याने व्यापारी वर्गामधून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.