वैशाली रमेश साळवे या विद्यार्थीनीचे इ दहावीमध्ये घवघवीत यश

वैशाली रमेश साळवे या विद्यार्थीनीचे इ दहावीमध्ये घवघवीत यश


महाराष्ट्र २४ आवाज


तळा (सुरेंद्र शेलार) श्री.रमेश देऊ साळवे व रेश्मा रमेश साळवे यांची कन्या कुमारी. वैशाली रमेश साळवे रा.तळा बौद्धवाडी ता.तळा जि.रायगड या विद्यार्थ्यांनीने माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता १० वी मध्ये तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री.गो.म.वेदक विद्यामंदिर तळे या महाविद्यालयातुन ७०.४०% गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. 



वैशालीने इयत्ता १० वी मध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच तिच्या वडिलांचे छत्र हरपले आणि घरामध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली परिणामी पूर्ण जबाबदारी तिच्या आईवर येऊन पडली, तिच्या आईने सुद्धा खचून न जाता घरातील ४ मुलींना शिक्षण दिले. आईच्या कष्टाची जाण ठेवून वैशालीने बिकट परिस्थितीत गरीबीचे कारण पुढे न करता अभ्यास केला आणि इयत्ता १० वी मध्ये चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन यश संपादन केले, तिला मिळालेल्या या यशामुळे तिच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहेे. तिने तळा बौद्धवाडीचे नाव रोशन केले याचा अभिमान संपूर्ण वाडीला झाला आहे.


नातेवाईक, सगेसोयरे, मित्रपरिवाराने मोबाइलच्या माध्यमातून संपर्क करून वैशाली हिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.


प्रेस संपादक व पत्रकार सेवासंघ महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र २४ आवाज न्युज चॅनल यांच्या वतीने वैशालीचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image