खंडापूर ते गंगापूर रस्त्यावर सकाळचे प्रहरी रंगली डुक्कर पार्टी.
महाराष्ट्र २४ आवाज
जिल्हा प्रतिनिधी- व्यंकटराव पनाळे
लातुर: दि. १९ - कोरोना ची प्रचंड महामारी रोखण्यासाठी प्रशासनाने लातूर जिल्ह्यात लाँकडाऊन जाहीर केलेले आहे. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र कोरोनाच्या बिमारीला रोखण्यासाठी जिवापाड मेहनत घेत असताना काही बिनडोक लोक मात्र लाँकडाऊन चा संपूर्ण फज्जा उडवताना दिसत असल्याचे प्रकरण ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी उघडकीस आणले आहे. खंडापूर ते गंगापूर रस्त्यावर गंगापूर शिवारामध्ये आंब्याचा मळा म्हणून ज्या भागाला ओळखले जाते, त्याच ठिकाणी रस्त्यावरच गंगापूर मधल्या काही महाभागानी डुकराची कत्तल करून त्याच ठिकाणी रस्त्यावरच भाजत बसले होते.
आज दिनांक १९ जुलै वार रविवार रोजी सकाळी ८ते ९ वाजण्याच्या दरम्यान हा सर्व प्रकार चालू असल्याचे व्यंकटराव पनाळे यांना समजताच प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन हे वृत्त संकलन केले आहे. गंगापूर गावापासून पाच ते सात फर्लांगभर अंतरावर डुक्कर भाजून कापून यांची डुक्कर पार्टी साजरी केली जात होती. कसलीही भीती या लोकांच्या चेहऱ्यावर दिसून आली नाही. तसेच त्यांच्या या कृतीने पोलिसांचा किंवा कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेचा लोकावर धाकच शिल्लक राहिला नाही असे चित्र निर्माण झाले आहे. हा सर्व प्रकार लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला आहे. प्रशासन याबाबत काय कार्यवाही करणार असा सवाल पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी व्यक्त केला असुन याबाबत काय कार्यवाही होणार याची उत्सुकता लोकात निर्माण झालेली आहे.