सर्पमित्र योगश कोस्तेकरने दिले कोब्रा व घोणस सापांना जिवदान
महाराष्ट्र 24 आवाज
रोहे,दि.३(समिर बामुगडे)
सर्पमित्र योगेश कोस्तेकरने एकाच दिवशी अत्यंत विषारी समजल्या जाणाऱ्या घोणस व कोब्रा या दोन सापांना पकडून जीवदान दिले आहे.
रोहे तालुक्यातील श्री क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी या गावात सर्पमित्र योगेश कोस्तेकरने हे दोन साप पकडून त्यांना जिवदान दिले आहे. सर्पमित्र योगेश.कोस्तेकर हा मुळचा माणगाव तालुक्यातील कोस्ते या गावचा रहिवासी असून लाँकडाऊन कालावधीत तळवली या गावी आपल्या मामाकडे वास्तव्यास आला.लाँकडाऊन कालावधीत त्याने मामाच्या गावाला राहून मामाचे गाव व आजूबाजूच्या परिसरात आतापर्यंत एकुण १५ विविध जातीच्या विषारी व बिनविषारी सापांना पकडून सुरक्षिततरित्या सोडून दिले आहे. तर ता.२८ रोजी त्याने तळवली येथील एका गुरांच्या गोठ्या शेजारी सुमारे ७ फुट लांबीच्या घोणस जातीच्या सापाला तर दुसऱ्या एका ठिकाणी त्यांने कोब्रा जातीचे सुमारे ७ फुटी सापाला जीवदान दिले आहे.दोन्ही साप लांबीने मोठे व अत्यंत विषारी त्यातच पकडण्याची जागाही अत्यंत अडचणीची असल्याने सुमारे अर्ध्या तासाहून अधिक वेळ त्याची साप पकडण्यासाठी धडपड सुरू होती.त्याच्या धाडसाबद्दल त्याचे परिसरात कौतूक होताना दिसत आहे.
सर्पमित्र योगेश कोस्तेकरला साप पकडण्यासाठी खुप ठिकाणी बोलावले जाते व क्षणाचाही विलंब न करता तोही साप पकडण्यासाठी त्वरीत जाऊन सापांना पकडून सुरक्षितरित्या सोडून जीवदान देत आला आहे. त्याने आतापर्यंत जवळ जवळ दीडशेहून अधिक साप पकडून त्यांना जीवदान दिले आहे.