रोहा आँनलाईन स्टडी पँटर्नचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

रोहा आॅनलाईन स्टडी पॅटर्नचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाट्न


महाराष्ट्र 24 आवाज


रोहे,दि.५(समिर बामुगडे)


कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.त्यामुळे विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी रोहे तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांनी बनविलेल्या आॅनलाईन स्टडी पॅटर्नचे उद्घाटन तालुका पं.समिती येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


       चालू शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी तालुक्यातील तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षकांनी एकत्र येऊन सदर अभिनव उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला आहे



 कोरोना काळात ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्गाचे हित लक्षात घेऊन इ.१ ली ते ७ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित सदर स्टडी पॅटर्नची सुरूवात करण्यात आली असून अभ्यासक्रमात कविता, गोष्टी, संवाद, इतिहासातील प्रसंग,गणितीय क्रिया,कला, कार्यानुभव,शा.शिक्षण आदी विषयांवर सोप्या पद्धतीने अभ्यासक्रम तयार करून पीडीएफच्या माध्यमातून विद्यार्थी वर्गाला संबोधित केले जाणार आहे.


पहिल्या टप्प्यात जुलै ते आगस्ट पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित साहित्य तयार केले असून त्याचे उद्घाटन गट विकास अधिकारी जयेंद्र जाधव, सहायक गट विकास अधिकारी पंडीत राठोड,गट विकास अधिकारी साधुराम बांगारे,जिल्हा क्रीडा व शिक्षण समिती सदस्य अजय कापसे, केंद्र प्रमुख नारायण गायकर, संतोष यादव यांच्या हस्ते करण्यात आले.


तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक अरूण घाग,जयेश भोईर,अमिता बामणे,रुपाली कापसे, वैशाली खराडे,वर्षाराणी मुंगसे,सौ.गुरव,श्रीम.सोनल पाटील, अंजना बिराजे यांनी साहित्याची निर्मिती केली असून तंत्रस्नेही शिक्षक अल्ताफ शेख व नंदकुमार तेलंगे यांनी सुंदर अभ्यासक्रम तयार केला आहे.


          तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांनी तयार केलेल्या या अभ्यासक्रमाबद्दल पं.स.सभापती गुलाब वाघमारे व उपसभापती रामचंद्र सकपाल यांनी शिक्षकांचे अभिनंदन करून समाधान व्यक्त करून विशेष कौतूक केले आहेत. तर या अभ्यासक्रमाचा फायदा विद्यार्थी वर्गाला घरबसल्या ज्ञानार्जनासाठी नक्किच होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.


 


चौकटीत.,.


अतिशय मेहनतीने तालुक्यातील शिक्षकांनी सदरचा अभ्यासक्रम तयार केला असल्याने घर बसल्या विद्यार्थी वर्गाला त्याचा नक्कीच चांगला फायदा होईल.


साधुराम बांगारे,गट शिक्षण अधिकारी रोहा.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
पत्रकारांना हात लावाल तर याद राखा- डी.टी.आंबेगावे उदगीर येथे तालुका कार्यालयाचे शानदार उदघाटन
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image