विजेचा शॉक लागून वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू.

विजेचा शॉक लागून वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू.


महाराष्ट्र 24 आवाज


(तळा श्रीकांत नांदगावकर) तळा तालुक्यातील महावितरणचे कर्मचारी केसरसिंग चव्हाण यांना विजेचा हायटेंशन विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.तळा तालुक्यात गेले अनेक दिवस वीस लाईनमन कार्यरत होते.त्यापैकी केसरसिंग चव्हाण हे मांदाड येथील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम करत असताना त्यांना हायटेंशन विद्युत वाहिनीचा शॉक बसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.मृत्यू समयी ते ५१ वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.



केसरसिंग चव्हाण हे मितभाषी व प्रेमळ स्वभावाचे होते.गेल्या तेरा वर्षांपासून ते तळा येथे महावितरण विभागात कार्यरत होते.वीजपुरवठा खंडित झाल्यास चव्हाण यांना अर्ध्या रात्री जरी बोलाविले तरी ते हजर व्हायचे त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे तालुक्यातील नागरिकांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध जोडले गेले होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच तळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image