<no title>

कुमारी अपूर्वा रोशन मोरे उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा १२ वी वाणिज्य (कॉमर्स) शाखेतून ७०.७६% ने उत्तीर्ण


 


महाराष्ट्र २४ आवाज



तळा(सुरेंद्र शेलार) चांगुना सोनू पवार यांचे नातू श्री रोशन मनोहर मोरे व श्रीमती रोहीणी रोशन मोरे यांची सुकन्या कुमारी अपूर्वा रोशन मोरे राहणार नेरुळ सेक्टर नंबर २० नवी मुंबई हिने तीच्या आईवडिलांच्या कष्टाचे चीज करून आणि स्वतः अभ्यासात मेहनत घेऊन उच्च माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता १२ वी मध्ये नवी मुंबई येथील तेरना कॉलेज मधून शिक्षण घेऊन वाणिज्य (कॉमर्स) शाखेतुन ७०.७६% गुण मिळवून आपल्या आईवडीलांचे नाव, तसेच ती शिक्षण घेत असलेल्या नवी मुंबईतील तेरना कॉलेजचे नाव आणि तिच्या शिक्षकांचे नाव उज्वल करून टाकले आहे, तसेच तिचे मूळ गाव उसरखुर्द तालुका तळा जिल्हा रायगड या गावचे तसेच स्वतःच्या समाजाचे नाव उज्वल केले आहे.


 कोरोनाच्या आलेल्या या महामारीच्या संकटाला संपूर्ण देश तोंड देत आहेत, त्यात प्रत्येक परीक्षार्थीला व पालक वर्गाला लागलेली निकालाची प्रतिक्षा, निकाल कधी लागेल या चिंतेत सर्वजण होते, परंतु ज्यावेळी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षणमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांनी निकालाच्या तारखेची घोषणा केल्यावर विद्यार्थी वर्गाने आणि पालक वर्गाने सुटेकेचा निःश्वास टाकला.


१६ जुलै २०२० रोजी निकाल लागल्यानंतर संपूर्ण मोरे कुटूंबात आनंदाचे वातावरण पसरले होते. नातेवाईक, सगेसोयरे मित्रपरिवाराने मोबाइलच्या माध्यमातून संपर्क करून अपूर्वा हिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.


अपूर्वा रोशन मोरे ही पुढील शिक्षण सनदी लेखापाल Chartered accountant (CA) घेऊन समाजाची सेवा करणार अशी इच्छा व्यक्त केली आहे.


प्रेस संपादक व पत्रकार सेवासंघ तसेच महाराष्ट्र २४ आवाज यांच्या वतीने अपूर्वा हिस पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image