<no title>

गो.म.वेदक.विद्यामंदिर तळा १० वीचा ९८.९६ % तर प्र.म.जोशी प्रशाला पन्हेळीचा १००% निकाल.


महाराष्ट्र २४ आवाज



तळा (श्री किशोर पितळे) बुधवारी दुपारी एक वाजता दहावीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन पध्दतीने निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गो.म.वेदक विद्यामंदिर तळा चा एकूण निकाल ९८.९६% लागला. तर डाॅ. प्रभाकर म.जोशी प्रशाला पन्हेळीचा १००% निकाल लागला असून तळा हायस्कूलचा विद्यार्थी विराज गोविंद भौड ८६.२०% प्रथम, श्रीयश राजेश महाले ८५.८०% द्वितीय आणि कु.साक्षी गणेश काटे ८२.८०% तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.एकूण ९६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी एक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला असून शेकडा ९८.९६% निकाल लागला तर पन्हेळी हायस्कूलचा विद्यार्थी नरेश दताराम गायकर ८६.२०% प्रथम,रोशन रमेश शिगवण ८३.४०% द्वितीय आणि कु.प्रज्ञा भिमराज जाधव८३.२०% तृतीय असा निकाल लागला आहे. एकूूण २० विद्यार्थी परीक्षेला पृविष्ट झाले होते पैकी २० विद्यार्थी पास होऊन १००% निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याला कलाटणी देणारा दहावीचा निकाल लागला आहे. याकडे विद्यार्थी व सर्व पालकांचे लक्ष लागले होते. ग्रामीण  दुर्गम डोंगराळ भाग असलेल्या तळा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी शिक्षणात नेहमीच चांगल्या प्रकारे प्रगती केलेली दिसत आहे तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री गो.म.वेदक विद्यामंदिर व डाॅ.प्र.म.जोशी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी १० वीच्या परिक्षेत मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे, उपाध्यक्ष पुरूषोत्तम मुळे, सचिव मंगेशशेठ देशमुख, गो.म.वेदक विद्यालय व डाॅ.प्र.म.जोशी विद्यालयाचे चेअरमन महेंद्रशेठ कजबजे, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्रीराम कजबजे, प्राथमिक विभागाचे चेअरमन किरणशेठ देशमुख, वरिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन डाॅ. श्रीनिवास वेदक संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक बी. झेड. धुमाळ, डाॅ प्र.म.जोशी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एम.डी. व्यवहारे सर्व शिक्षक, पालक व तालुक्यातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image