तळा ज्युनियर काॅलेज इ १२ वीचा निकाल ९६.८१ %

तळा येथील कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९६.८१ % 


महाराष्ट्र २४ आवाज


(तळा श्रीकांत नांदगावकर) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२० इ.१२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी १.०० वा. मंडळाच्या अधिकृत संकेतस्तळावर ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला असून तळा येथील कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा १०० %, वाणिज्य शाखा ९५.२७ % व कला शाखेचा ९६.४२ % असा एकूण निकाल ९६.८१ % लागला आहे. यामध्ये कला शाखेतून प्रथम क्रमांक राजरत्नेश संतोष गायकवाड (६४.०० %), द्वितीय क्रमांक प्रतिक्षा काशिनाथ तटकरे (६२.०० %) व तृतीय क्रमांक ज्ञानेश्वर पांडुरंग शेडगे (६०.३० %) तर वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक साक्षी सचिन कीर्तने (८३.०७ %), द्वितीय क्रमांक तेजस्वी किशोर शिर्के (८१.३८ %) व तृतीय क्रमांक रोहन गजानन मिरगळ(८०.३०%) आणि विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक आदर्श मनिष तळेकर (७४.३० %), द्वितीय क्रमांक सुजान अ. रहीम खानदेशी (७२.७६ %) व तृतीय क्रमांक साहील किरण मेकडे (७०.९२ %)या विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयातून घवघवीत यश प्राप्त केले आहे.



संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे, उपाध्यक्ष श्री पुरूषोत्तम मुळे, सचिव श्री मंगेशशेठ देशमुख, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्री श्रीराम कजबजे, गो.म.वेदक विद्यालयाचे चेअरमन श्री महेंद्र कजबजे, संस्थेचे सर्व पदाधिकारी प्राचार्य श्री बी. झेड. धुमाळ, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री एन.सी. पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image