डॉ. श्री . नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा आयोजित रक्तदान शिबिर
महाराष्ट्र 24 आवाज
अहमदपूर प्रतिनिधी महादेव महाजन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी लोकांना आवाहान केले आहे की बाधित लोकांसाठी रक्ताची गरज आहे आणि ब्लड बॅंकेमध्ये रक्ताचा तुटवडा आहे या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांनी पुढाकार घेऊन अहमदपूर येथे रक्तदान शिबिर घेतले
या प्रतिष्ठान मार्फत स्वच्छता अभियान महाआरोग्य शिबिर हे ते डी वाय पाटील स्टेडियम मुंबई ला घेण्यात आले यामध्ये 153000 लोकांची मोफत आरोग्य तपासणी करून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये याची नोंद करण्यात आली तसेच वृक्ष लागवड गावात समशान भूमी सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड तर केलीच व पाच वर्षे संगोपन करून त्या वृक्षांना शासनाच्या ताब्यात देण्यात आली तसेच विहीर व बोअरचे पुनर्भरण करण्याचे काम या प्रतिष्ठान नी केले आहे .
या रक्तदान शिबिरास अमदपुर पोलीस स्टेशनचे एपीआय चव्हाण साहेब तसेच पंचायत समितीचे माजी सभापती सुधीर गोरटे सर यांनी भेट दिली
रक्तदान शिबिर वीर शासनाचे पूर्ण नियमाचे पालन करून सोशल डिस्टंसिंग व सिने टायझर करून करण्यात आली या कार्यक्रमाला सोलापूर लातूर व अहमदपूरचे श्री चे सर्व कार्यकर्ते होते
चौकट-केवळ मुख्यमंत्री ठाकरे साहेबांच्या सांगण्यावरून मे-जून-जुलै या तीन महिन्यात जवळपास दहा हजार बॅगचे रक्त संकलन करण्यात आले . व राज्यात रक्ताचा तुटवडा पडला तर आणखीन बँकेने म्हणेल तेवढे रक्तपुरवठा करण्याची हामी श्री अॅड.उमेश भोजने सर यांनी दिली