तळा तालुक्यात आढळला नवीन कोरोना बाधीत रूग्ण बाधित रूग्णांची संख्या तीन तालुक्याची संख्या पोहचली १७ वर

तळा तालुक्यात आढळला नवीन कोरोना बाधीत रूग्ण


  बाधित रूग्णांची संख्या तीन  


   तालुक्याची संख्या पोहचली १७ वर


महाराष्ट्र 24 आवाज


तळा(किशोर पितळे)संपूर्ण देशात कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असल्याने प्रशासनाने विविध उपाययोजना करून कोरोनांचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी अंमलबजावणी केली असतांना नागरीकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत होता लाँकडाऊन शिथील झाल्याने रायगड जिल्ह्यात कोरोनाने डोकं वर काढले असून तळा नगरपंचायत हद्दितील आनंदवाडी येथील एका २२ वर्षीय तरूणाचा  रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सदर २२ वर्षीय व्यक्ती एप्रिलमध्ये नालासोपाऱ्याहून आलेली असून तो आजारी पडल्याने उपचारासाठी माणगाव येथे नेली असता त्याच्यामधे कोरोना सदृश्य लक्षणे दिसू लागल्याने त्याचे स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्याचा स्वॅब चाचणी रिपोर्ट १ जुलै रोजी सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. माणगाव-लोणेरे येथे त्याच्यावर उपचार सुरू असून त्याच्या संपर्कात आलेल्या १० व्यक्तींना क्वाॅरंटाईन करून ठेवण्यात आले असून आनंदवाडी पुर्ण गाव सिल (कंटेन्मेंटझोन) करण्यात आले आहे. यापूर्वी तालुक्यात १४ कोरोना रूग्ण आढळून आले होते त्यापैकी १२ रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात करून कोरोना मुक्त झाले तर २ रूग्ण मृत पावले. सद्यस्थितीत नव्याने ३ रूग्ण आहेत. महीन्याभरापासून तळा तालुका कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत असतानाच बारपे गावातील एक रूग्ण ४५ वर्षीय व्यक्ती दि २४ रोजी पाॅझिटीव्ह आढळून आल्यानंतर चार दिवसाच्या फरकाने १७ वर्षाची मुलगी कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आली यानंतर हा रूग्ण आढळून आल्याने तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.



प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. त्यामुळे प्रशासनाचे टेंशन वाढले आहे. सदर माहिती तळा तहसिल कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात तळा तालुक्यात त्या मानाने कोरोना रूग्णाचे प्रमाण अगदी नगण्य होते त्यामुळे जवळ जवळ कोरोना मुक्त झाला होता. आता मात्र तालुक्यातील सर्वांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अजूनही हा कोरोना रोखण्यासाठी प्रभावीपणे स्वतःहून प्रयत्न करणे आवश्यक आहे. शहरात येणारे ग्राहक सोशल व फिजिकल डिस्टन्स पाळत नसल्याचे दिसून येत आहे.बँकेच्या आवारात फिजिकल डिस्टन्स पाळले जात नाही बाजारात येण्यासाठी रिक्षा मिनिडोअरचा वापर केला जात असून अजूनही काही नागरीक गांभिर्याने घेताना दिसत नाहीत. लाॅकडाॅऊन व संचारबंदी शिथील केल्याने वैयक्तिक स्वसंरक्षणाचे नियम शिथील केले आहेत, मास्कचा वापर जास्त होतांना दिसत नसल्याचे निदर्शनास येत आहे. स्वतःबरोबर इतरांची पण काळजी घ्या , प्रशासनाला सहकार्य करा असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
पत्रकारांना हात लावाल तर याद राखा- डी.टी.आंबेगावे उदगीर येथे तालुका कार्यालयाचे शानदार उदघाटन
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image