कोरोनाला भिऊन देवाधिदेव महादेव यांनीच करून घेतले काॅरंटाईन
महाराष्ट्र २४ आवाज
अहमदपूर प्रतिनिधी महादेव
महाजन
श्रावण महिना म्हंटला की हिंदू संस्कृतीतला पवित्र महिना समजला जातो. या महिन्यात हिंदू बांधव महादेवाचे दर्शन व बेलपञी वाहण्यासाठी अवश्य महादेव मंदिरात जातात, पण यावर्षी शहरात गेल्या काही दिवसापासून पेशंट वाढले व महादेव गल्ली यामध्ये मागे राहिली नाही याचा परिणाम असा झाला की देवाधिदेव महादेवाने
पण आपणास इशारा दिला आहे की सध्या माझ्या मंदिरात न येता घरीच राहून शासनाच्या नियमाचे पालन करा.
अहमदपूर शहर व परिसरात ९३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळली तर ४११ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे यामध्ये महादेव मंदिर परिसरातील दोन दिवसापूर्वी एक बाधित रुग्ण आढळला त्यामुळे महादेव मंदिर परिसर व महादेव गल्ली सील करण्यात आली परिणामी देवाधिदेव महादेव यांनी पण स्वतःला कोरणटाईन करून घेतले की काय ॽ असा प्रश्न जनतेच्या मनात येत आहे.
चौकट-मंदिर व्यवस्थापक आचार्य गुरुराज स्वामी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता यावर्षीचे चे सर्व धार्मिक कार्यक्रम दरवर्षी होणारा शिवपंचाक्षरी मंत्र जप रुद्राभिषेक व बेलाच्या झाडाची पूजा शिवपाठ शिव कीर्तन शिव भजन हे सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती दिली