लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर 'भारतरत्न' द्यावे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन विधानसभेत भारतरत्नचा ठराव करून केंद्रास पाठविण्याचे आवाहन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर 'भारतरत्न' द्यावे


   प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन


 विधानसभेत भारतरत्नचा ठराव करून केंद्रास पाठविण्याचे आवाहन


महाराष्ट्र 24 आवाज


उपसंपादक- संजीव भांबोरे


 भंडारा - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता 1 ऑगस्ट 2020 रोजी पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने विधानसभेत अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा असा ठराव मंजूर करून केंद्र सरकारला पाठवावे याबाबदचे निवेदन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी. टी. यांच्या मार्गदर्शनानूसार व राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेलद्वारे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य सह सचिव संजीव भांबोरे, विदर्भ सरचिटणीस शेखर बोरकर, भंडारा जिल्हा अध्यक्ष डॉ. देवानंद नंदागवळी यांच्यामार्फत आज दिनांक 30/7/2020 रोजी निवेदन पाठविण्यात आले.



संयुक्त महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. दलित, शोषित,पीडित, वंचित, यांच्या व्यथा, वेदना आपल्या साहित्यातून प्रभावीपणे मांडल्या. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र रशियापर्यंत पोहचविण्याचे काम अण्णाभाऊ साठे यांनी केले. त्यांचे जीवन संघर्षमय होते. त्यांनी अनेक कथा, कादंबऱ्या, लघुपट,पोवाडे, वगनाट्य असे विविध प्रकारचे साहित्य लिहून साहित्यामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. त्यांना मरणोत्तर 'भारतरत्न' किताब देऊन सन्मानित करण्यात यावे असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मागणी आहे.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image