शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं निधन

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं निधन


महाराष्ट्र २४ आवाज


प्रतिनिधी-पंडित मोहिते-पाटील


मुंबई, ०३ ऑगस्ट : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा मनोहर जोशी यांचं वृद्धापकाळ्ने निधन झालं आहे. त्यांचं वय ७५ होतं. मुंबईत मनोहर जोशी यांच्या दादर इथल्या घरी रात्री ११ वाजता अनघा यांचं निधन झालं. दादर इथल्या स्मशानभूमित त्यांच्यावर अंतिमसंस्कार केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.



अनघा यांचा १४ मे १९६४ रोजी मनोहर जोशी यांच्याशी विवाह झाला होता. त्यांचं माहेरचं नाव होतं मंगल हिगवे. त्यांचा जन्म २ जानेवारी १९४५ रोजी झाला. अनघा जोशी यांच्या पश्चात पती मनोहर जोशी, पुत्र उन्मेष जोशी, अस्मिता आणि नम्रता या दोन कन्या, जावई गिरीश व्यास असं मोठं कुटुंब आहे.


आतापर्यंत संपूर्ण वाटचालीमध्ये मनोहर जोशी यांच्या पाठीमागे त्या खंबीर उभ्या राहिल्या. त्यांनी मनोहर जोशी यांना राजकीय व सामाजिक जीवनात मोलाची साथ दिली.


मनोहर जोशी यांचा राजकीय प्रवास सुरू झाला तेव्हा कायम त्यांच्या मागे उभ्या असायच्या. १९६८ मध्ये दादरमधून मुंबई महापालिकेत नगरसेवकपदी निवडून आले होते. त्यानंतर मुंबईचे महापौर, विधानपरिषद, विधानसभा आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, लोकसभा खासदार, केंद्रीय मंत्रिपद, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा अशी त्यांची राजकीय कारकीर्द उमलत गेली. या सगळ्या प्रवासात साथ देणाऱ्या अनघा यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image