विजेच्या जिवंत तार तुटल्याने शेती कामातील बैलांचा मृत्यू
पोलीस स्टेशन अंजनगाव येथे तक्रार दाखल
देवगाव शेत शिवारातील घटना
पोलीस विभाग व वी. वी. वी. कंपनीचा पंचनामा तय्यार
महाराष्ट्र २४ आवाज
जिल्ह प्रतिनिधी- गजानन हुरपडे
अंजनगाव तालुक्यातील देवगाव शेतशिवारात बैलांना चारा आणण्या साठी जाणाऱ्या शेत मजुराच्या बैलबंडीवर सीतारामजी नाथे यांचे शेता जवळ विजेचा जिवंत तार तुटून पडला आणि त्यावर शाहदात अली शौकत अली यांचे स्वमालकीचे बैल जोडीचा मृत्यू झाला. त्यावेळी त्या बैल बंडीस शौकत अली यांचा मुलगा न्याज अली व पुतण्या जाकीर अली हाकलत होता. मात्र सुदैवाने बैलबंडी लाकडाची असल्यामुळे कोणतीही मनुष्य जीवित हानी झाली नाही. मात्र त्या शेत मजुराच्या रोजी कमाईचे साधन हिरवल्या गेले. त्यांचे मुलाने लगेच फोनवर दिलेल्या सुचने मुळे शौकत यांनी विधुत विज वितरण कंपनीशी संपर्क केला. ज्यामुळे लगेच पुढील कार्यवाही झाल्याने पुढील अनर्थ टळला. पोलीस स्टेशनं अंजनगाव येथे तक्कार दाखल झाली असून पी. एस. आय. जाधव व त्यांचे साह्य. गजानन चौधरी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा व पुढील कार्यवाही केली. मात्र शेतकऱ्यांवर व शेतमजुरांवर नैसर्गिक अपदेची शृंखला सुटता सुटण्याचे थांबत नसून शेतकी व्यावसायिक त्यामुळे हताश झाले असल्याचे दिसत आहे.