कावेरी राजू कांबळे या विद्यार्थीनीचे इ दहावीमध्ये घवघवीत यश

कावेरी राजू कांबळे या विद्यार्थीनीचे इ दहावीमध्ये घवघवीत यश


महाराष्ट्र २४ आवाज



तळा (सुरेंद्र शेलार) दिवंगत राजू सखाराम कांबळे व रसिका राजू कांबळे यांची कन्या कु.कावेरी राजू कांबळे रा.वारेकर चाळ मुंब्रादेवी कॉलनी दिवा (पूर्व) येथे राहत असून या विद्यार्थ्यांनीने माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता १० वी मध्ये एस.एच.जोंधळे विद्यामंदिर डोंबिवली येथून ७१.८० % गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. 


कावेरीचे वडील तिच्या बालपणातच निघून गेल्यामुळे तिच्यावरील वडिलांचे छत्र हरपले आणि पूर्ण जबाबदारी तिच्या आईवर येऊन पडली, तिच्या आईने ती आलेली जबाबदारी स्वीकारून एकुलत्या एक मुलीला शिक्षण देण्याचा निर्धार केला.


कावेरीला मायेचा आधार तिचे आजीआजोबा सखाराम कांबळे आणि सुवर्णा कांबळे यांनी दिला तसेच चुलता हेमंत कांबळे याचे सुद्धा तिच्या यशामागे योगदान आहे..


मुंबई या ठिकाणी तिच्या आईने नोकरी करून मुलीला शिक्षण दिले, आईच्या या कष्टाचे चिज करून अभ्यासात मेहनत घेऊन इयत्ता १० वी मध्ये कावेरीने उत्तम यश संपादन केले आहे.


तिला मिळालेल्या या यशामुळे तिच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहेे.


कावेरीने तळा बौद्धवाडीचे नाव रोशन केले, याचा अभिमान संपूर्ण वाडीला झाला आहे.


नातेवाईक, सगेसोयरे, मित्रपरिवाराने मोबाइलच्या माध्यमातून संपर्क करून कावेरीवर शुभेच्छांचा वर्षाव केला.


प्रेस संपादक व पत्रकार सेवासंघ महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र २४ आवाज न्युज चॅनल यांच्या वतीने कावेरीचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
पत्रकारांना हात लावाल तर याद राखा- डी.टी.आंबेगावे उदगीर येथे तालुका कार्यालयाचे शानदार उदघाटन
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image