सुमन रमेश तूल्सियानी ट्रस्ट तर्फे पंतप्रधान कोविड निधी करिता १ कोटी रुपयांची मदत.
महाराष्ट्र २४ आवाज
(तळा श्रीकांत नांदगावकर) भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.कोरोना रुग्णांच्या वाढत चाललेल्या संख्येमुळे देशाची आर्थिक स्थिती कमकुवत होत चालली आहे.त्यामुळे नागरिकांनी पंतप्रधान कोविड निधी ला मदत करण्याचे आवाहन भारत सरकारकडून करण्यात आले आहे सरकारच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सुमन रमेश तुल्सियानी ट्रस्ट तर्फे पंतप्रधान कोविड निधी करिता १ कोटी रुपयांची मदत करण्यात करण्यात आली.सुमन रमेश तूल्सियानी ट्रस्ट तर्फे दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात विविध संस्था तसेच गरजूंना देखील ट्रस्ट तर्फे सहकार्य केले जाते. त्याच अनुषंगाने ट्रस्ट कडून पंतप्रधान कोविड निधी साठी १ कोटी रुपयांची मदत करण्यात आली त्याचे पत्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे देण्यात आले.या प्रसंगी ट्रस्ट चे सदस्य मनीष रूपानी,सुदेश शिर्के,नाना पालकर स्मृती चिन्ह व्यवस्थापक व सामाजिक कार्यकर्ते कृष्णा महाडीक उपस्थित होते.