भंडारा ते पौनी मुख्य राज्य मार्गाच्या रस्त्याच्या कामाची गती वाढवा अन्यथा प्रहार जनशक्ती च्या वतीने आंदोलन
महाराष्ट्र २४ आवाज
उपसंपादक संजीव भांबोरे
भंडारा ते पौंनी मुख्य राज्य मार्गाचे रुंदीकरणाचे काम मंद गतीने सुरू असून पहेला ते अडयाल रस्त्यावर माती व मुरूमाचा मोठ्या प्रमाणात भरणा केल्यामुळे पावसाळ्यात टू व्हिलर व फोर व्हिलर येण्या जाण्याकरिता नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. वेळप्रसंगी अपघात व गाडी स्लिप होऊन पडण्याची भीती असते. त्यामुळे कामाची गती वाढवावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी भंडारा, उपविभागीय कार्यकारी अभियंता ,पोलीस स्टेशन अड्याळ यांना निवेदनातून दिलेला आहे. याप्रसंगी प्रहार शहर प्रमुख कुणाल शहारे, तालुका प्रमुख जितू मेश्राम ,जिल्हा प्रहार सेवक विनोद वंजारी,भंडारा शहर रूग्ण सेवक राहुल लेदे निवेदन देताना उपस्थित होते.