१० बाय १० च्या मुंबई झोपडीत अभ्यास करून कु.रूपाली काळूराम गायकवाड इ.१० वी मध्ये ९१.४०% गुणाने मुंबई कुलाबा विभागातून प्रथम
महाराष्ट्र २४ आवाज
तळा (सुरेंद्र शेलार) श्री.काळूराम चंद्रकांत गायकवाड व कविता काळूराम गायकवाड यांची कन्या कुमारी.रूपाली चंद्रकांत गायकवाड रा.कुलाबा सुंदर नगरी मुंबई या विद्यार्थीनीने माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता १० वी मध्ये कुलाबा म्युनिसिपल सेकेंडरी हायस्कूल मुंबई मधून ९१.४०% गुण प्राप्त करून संपूर्ण कुलाबा विभातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा सन्मान प्राप्त केला आहे..
कुलाबा विभाग हा मुंबईधील सुप्रसिद्ध विभाग समजला जातो त्या विभागात ज्यांच्याकडे एसी, टीव्ही, इंटरनेट सुविधा, ट्युशन अभ्यासाठी वेगळी खोली इतक्या सुखसुविधा असून देखील तेथिल विद्यार्थ्यांना इतके मोठे यश संपादन करता येऊ शकले नाही, परंतू रूपालीने तिचे आजीआजोबा श्री.चंद्रकांत गायकवाड आणि संगीता गायकवाड यांच्या येथे 10 बाय 10 च्या खोलीत झोपडपट्टीमध्ये राहून ना खुर्ची ना साधे टेबल तर जमीनीवर बसून गरिबीची जाण ठेऊन अभ्यास केला आणि संपूर्ण कुलाबा मुंबई विभागातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे..
रूपाली ही विद्यार्थीनी बौद्ध समाजाची असून तिचे मूळगाव इंदापूर विभागातील पोटणेर तालुका माणगाव येथील असून मुंबई कुलाबा विभागातुन तिने मिळवलेले यश आपल्या रायगड वासीयांसाठी अभिमानास्पद आहे, कारण कुलाबा आणि रायगड यांचे फारपूर्वी काळापासून ऐतिहासिक नाते आहे ते म्हणजे आपला आत्ताचा रायगड जिल्हा हा पूर्वी कुलाबा जिल्हा म्हणून नकाशावर ओळखला जात होता परंतु १ जानेवारी १९८१ साली तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बॅ.ए.आर. अंतुले यांनी कुलाबा जिल्हा नाव बदलून रायगड जिल्हा असे नामांतर केले. रूपालीने मिळवलेल्या यशामुळे तिच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे..तिच्या या यशामध्ये आजीआजोबा आई वडील आणि काका सचिन गायकवाड यांचा खारीचा वाटा आहे,
नातेवाईक, सगेसोयरे, मित्रपरिवाराने मोबाइलच्या माध्यमातून संपर्क करून रूपालीवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
प्रेस संपादक व पत्रकार सेवासंघ महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र २४ आवाज न्युज चॅनल यांच्यावतीने रूपालीचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!