कोरोनामुळे मृत्यू पावलेले पत्रकार गंगाधरराव सोमवंशी यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव पनाळे यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट
जिल्हाधिकारी यांनी दिले आश्वासन
महाराष्ट्र २४ आवाज
उपसंपादक- लक्ष्मण कांबळे
लातूर : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकार वै. गंगाधरराव सोमवंशी यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी आणि तसा प्रस्ताव शासनाला पाठवावा. तसेच शासकीय रुग्णालयात कोरोनाचा उपचार घेत असलेल्या वृद्ध महिला सौ काशीबाई शेषराव पाटोळे यांना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांने केलेल्या मारहाणी संदर्भात आपण कार्यवाही करावी अशी मागणी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेच्या प्रसंगी लातूरचे ज्येष्ठ पत्रकार प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव पनाळे यांनी जिल्हाधिकारी श्री. जी. श्रीकांत यांना भेटून केली. त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी पत्रकार वै. गंगाधर सोमवंशी यांचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून शासनाकडे पाठवून देतो आणि महिला रुग्णास झालेल्या मारहाण प्रकरणी चौकशी करून मी कार्यवाही करतो असे आश्वासन दिले.