सोनवती मध्ये कोरोना ने घेतली आघाडी. प्रशासनाच्या प्रेस नोट मध्ये तर सोनवती गावाचा उल्लेखही नाही.

सोनवती मध्ये कोरोना ने घेतली आघाडी. 


प्रशासनाच्या प्रेस नोट मध्ये तर सोनवती गावाचा उल्लेखही नाही. 


महाराष्ट्र २४ आवाज



{ व्यंकटराव पनाळे, जिल्हा प्रतिनिधी } 


लातूर : दि. १० - लातूर तालुक्यातील सोनवती गावात आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र भातांगळी यांच्या अंतर्गत डॉ. सागिरा पठाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखालील चमूने कोरोना रॅपिड टेस्ट घेतली. आज सकाळ पासून दुपारी २ वाजेपर्यंत एकूण ८३ लोकांची कोरोना रॅपिड टेस्टची तपासणी करण्यात आली. यापैकी २७ महिला व पुरुष कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आलेले आहे. या सोनवती गावच्या सर्व २७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सोनवती येथुन बसने लातूर बार्शी रोडवर मांजरा कारखान्याच्या समोरील एमआयडीसीतील समाज कल्याण खात्याच्या वस्तीगृहामध्ये काँरनटाईन सेंटरला हलविण्यात आले आहे.



यापूर्वी गावात ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत. पैकी १ महिला कोरोना पॉझिटिव रुग्णाचा मृत्यूही झालेला आहे. सोनवती गावची लोकसंख्या अंदाजे ३ हजार व ५५० कुटुंब संख्या असल्याचे सांगितले जाते. ८३ व्यक्तींच्या तपासणीत जर २७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर संपूर्ण गावाची तपासणी केल्यानंतर हा आकडा कुठे असेल याचीच भीती व चर्चा संपूर्ण सोनवती गावात पसरलेली आहे. 


सोनवती गावात एवढा कोरोनाचा आगडोंब उसळला तरी आज निघालेल्या शासकीय प्रेस नोट मध्ये सोनवती गावाचा उल्लेखही नाही. याचे गौडबंगाल नेमके काय ? सोनवती गावाची माहिती लपवून ठेवण्या मागचे कारण तरी काय ? लातूरचे जिल्हाधिकारी श्री. जी. श्रीकांत याबाबतचे स्पष्टीकरण देतील काय ? आजच्या शासकीय प्रेस नोट वर जिल्हा शल्यचिकित्सक यांची स्वाक्षरी आहे ही प्रेस नोट काढत असताना जिल्हा शल्यचिकित्सक वाचून तरी बघतात काय ? या प्रेस नोट मध्ये गावांचे उल्लेख चुकीचे असतात. कोणतेही गाव कोणत्याही तालुक्यात दाखवले जाते. आजच्या प्रेसनोट मध्ये उदगीर तालुक्यात हरंगुळ गाव दाखवले आहे. शासकीय रुग्णालयातील प्रेसनोट काढणाऱ्या विभागाच्या आईचा घो, म्हणायची पाळी आलेली आहे. 



- व्यंकटराव पनाळे, पत्रकार 


   ९४२२०७२९४८


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image