प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव
महाराष्ट्र २४ आवाज
उपसंपादक- लक्ष्मण कांबळे
मुंबई : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी व जिल्हा शाखेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन काळामध्ये पत्रकार, पोलीस, डाॅक्टर, नर्स, सफाई कामगार, अंगणवाडी सेविका, व गोरगरीब जनतेला अन्नधान्याचे किट्स, फळे, मास्क, सॅनिटायझरचे मोफत वाटप करण्यात आले आहे.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्रातील विविध प्रकारचे उत्कृष्ट कार्य केल्याची दखल घेऊन शिवशंकर मुंगाटे मित्रपरिवारातर्फे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, पवनी तालुकाध्यक्ष प्रशांत शहारे यांचा सन्मानचिन्ह, कोरोना योद्धा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्रातील राज्य कार्यकारिणी पदाधिकारी, विभागीय कार्यकारिणी पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी , सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी , सभासद व पत्रकार बांधवाच्या वतीने भंडारा जिल्हा टीमचे अभिनंदन करण्यात आले.