प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या कार्याची घेतली दखल स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा कार्याध्यक्ष यांचा सन्मान

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या कार्याची घेतली दखल


स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा कार्याध्यक्ष यांचा सन्मान


 तहसिलदार घुगे व नगराध्यक्ष लाडोळे यांनी दिले प्रमाणपत्र


महाराष्ट्र २४ आवाज




जिल्हा प्रतिनिधी- गजानन हुरपडे


अंजनगाव सुर्जी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त पार पडलेल्या शासकीय राष्ट्रध्वजा नंतर तहसिल कार्यालयात नियोजित कोव्हीड योद्धा सन्मान कार्यक्रमात  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष गजानन हुरपडे यांना तहसिलदार घुगे व नगराध्यक्ष लाडोळे यांच्या हस्ते कोरोना काळात केलेल्या लोकहितार्थ कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.




संपूर्ण देश लॉकडाऊन मुळे कडकडीत बंद होता. अशात कित्येक मजूरवर्गातील नागरिकांची हलाखीची परिस्थिती होती. अशात हॉटेल व चहाची टपरी बंद असल्यामुळे कर्मचारी व कर्तव्यावर तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची दैना होती. त्यात सेवा निवृत्त सैनिक देखील रस्त्यावर उतरून सेवा देत होते. अशात पिण्याचे पाणी देखील मिळत नव्हते. त्यात बाहेर राज्यातून आलेले मजूर ज्यांना प्रशासनाने कॉरंटाईन केले. त्यांच्या चहा पाणी व नाश्ताची, जेवणाची व्यवस्था त्यांना त्यांचे गावाला सुखरूप पोहचविण्याची जबाबदारी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून पार पाडण्यात आली आहे. तसेच हलाखीच्या परिस्तिथीमध्ये असणाऱ्या लोकांना किराणाकिट देखील वाटप केले.


अशा विशेष व उल्लेखनिय कार्याबद्दल महसूल व वनविभाग प्रशासनाने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कार्याध्यक्ष गजानन हुरपडे यांचा सन्मान केला. यावेळी नवीन आलेले नगर परिषदचे मुख्याधिकारी सुमेध अलोने, नायब तहसीलदार मंगेश सोळंखे, अनंत पोटदुखे, आरोग्य सभापती सतीश वानखडे व तहसीलचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. कोरोना संकटकाळात आपली सर्वांची जबाबदारी वाढली आहे. ही जबाबदारी समर्थपणे पार पाडण्यासाठी आपले स्वतःचे आरोग्य सुदृढ असणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी स्वतःचे आरोग्यही जपावे, अशी सदिच्छा व्यक्त करत तहसीलदार घुगे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image