पत्रकार भवन साठी उदगीर येथे सुरू असलेल्या पत्रकारांच्या आंदोलनाला प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा जाहीर पाठिंबा.
- व्यंकटराव पनाळे, राज्य उपाध्यक्ष, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र.
महाराष्ट्र २४ आवाज
उपसंपादक- लक्ष्मण कांबळे
लातुर :- जिल्ह्यातील उदगीर तालुका येथील पत्रकार बांधवांना पत्रकार भवन च्या जागे साठी अनेक वेळा केवळ वांझोटी आश्वासनावर आश्वासने मिळाल्याने उदगीरच्या पत्रकारांनी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या कार्यालया समोर उपोषणास प्रारंभ केला आहे. या आंदोलनास प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष व्यंकटराव पनाळे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. राज्यव्यापी असलेल्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची ही अधिकृत भूमिका असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
उदगीर येथे पत्रकार भवन झाले पाहिजे यासाठी पत्रकारांनी अनेकवेळा आंदोलने केली आहेत. उदगीर नगरपरिषदेने पत्रकार भवन साठी जागा देण्याची घोषणाही केली होती. मात्र जागा घोषित केली पण ती प्रत्यक्षात जागा दिलीच नाही. पत्रकार भवनच्या जागेसाठी यावर्षी जानेवारी महिन्यात पत्रकारानी उदगीर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण केले होते.
त्या उपोषण प्रसंगी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी मी स्वतः येऊन महिन्याभरात जागेचा प्रश्न सोडवतो असे सांगून पत्रकारांच्या उपोषनाची सांगता केली होती. उपोषणाची सांगता होऊन ८ महिने झाले तरी हा प्रश्न सुटला नसल्याने आज गुरुवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजले पासून उदगीर येथील सर्व पत्रकार बांधवांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांच्या नगर परिषद उदगीर संकुलातील कार्यालया समोर भर पावसात उपोषणाला सुरुवात केली असून आता ही लढाई आरपारची समजून पत्रकारभवनाचे जागेचा प्रश्न निकाली निघाल्या शिवाय उपोशन स्थळावरून उठयचेच नाही असे पत्रकारांचे म्हणणे आहे. पत्रकारांच्या या भूमिकेला आणि आंदोलनाला प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने जाहीर पाठिंबा दिला असल्याचे संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मुक्त पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी जाहीर केले आहे.