विविध विकासकामांचा पालकमंत्री महोदयांकडुन आढावा महावितणाचे प्रश्न अधांतरीच;बैठका नको कृती करा नागरिकांची मागणी

विविध विकासकामांचा पालकमंत्री महोदयांकडुन आढावा


महावितणाचे प्रश्न अधांतरीच;बैठका नको कृती करा नागरिकांची मागणी.


महाराष्ट्र २४ आवाज


तळा संजय रिकामे


तळा : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी सभागृह पंचायत समिती तळा येथे विविध प्रलंबित विकास कामांबाबत आढावा सभा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.किरण पाटील, प्रांतांधिकारी प्रशाली दिघावकर,महावितरण रायगड अधिक्षक श्री.पाटील,तळा तहसीलदार श्री.कनशेट्टी,जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.मोरे,पोलीस निरीक्षक श्री.गेंगजे,गटविकास अधिकारी श्री.व्ही.व्ही यादव,नगराध्यक्षा सौ.रेश्मा मुंढे,माजि जिल्हा प्रमुख रवीभाउ मुंढे,पंचायत समिती सभापती देविका लासे,उपसभापती गणेश वाघमारे,राजिप सदस्य बबन चाचले,पं.स.सदस्या अक्षरा कदम  नगरसेवक चंद्रकांत रोडे विविध ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि तळेवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   



                                                      सुरवातिस महावितरण संदर्भात असलेल्या तक्रारींवर चर्चा करण्यात आली.यावेळी  महावितणाचे अनेक प्रश्न अधांतरी आहेत.वारंवार पाठपुरावा करुनही महावितरण प्रशासनाकडुन वेळ मारुन नेली जात आहे.चक्री वादळानंतर महावितरण संदर्भात अनेक आढावा बैठका तहसिल कार्यालय, पंचायत समिती सभागृहात पार पडल्या परंतु या आढावा बैठकीत केवळ आश्वासनांचा पाऊस यापलिकडे काहीच झालेले नाही लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सुचनांना केराची टोपली महावितरणाच्या अधिकारी वर्गाने दिली आहे त्यामुळे आढावा बैठक जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी की अधिकारयांची तोंड बघण्यासाठी घेतली जाते असा संताप शिवसेना माजी जिल्हा प्रमुख रवीभाऊ मुंढे यांनी व्यक्त केला.



          विविध गावातील नागरिकांनी दोन महीने होऊन गेले तरी सुध्दा गावातील पोल अजुन बसले नसल्याच्या तक्रारी केल्या.वीज पुरवठा खंडित होत असल्याने अनेक गावातील पाणी पुरवठा योजना बंद आहेत काहींचे ट्रान्सफार्मर देखील अजुन बसविलेले नाहीत अशा अनेक प्रकारच्या तक्रारी महावितरण संदर्भात करण्यात आल्या परंतु अधिकारी वर्गाने कुठल्याही प्रकारचे समर्पक उत्तर दिले नाही.बैठकांवर बैठका घेण्यापेक्षा वारंवार खंडीत होणारया विज पुरवठा  समस्येला तोंड देणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी आता बैठका नको तर झालेल्या बैठकांमधील निर्णयावर कृती करा अशा प्रकारची मागणी नागरिकांकडुन करण्यात आली.नागरिकांकडुन आलेेल्या मागणीनुसार त्वरित कामे पुर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिले.नुकसानग्रस्तांना शासनाकडुन मिळणारा निधी हा बँक आॅफ इंडियातील आडमुठे धोरणामुळे नागरिकांना मिळत नसल्याचे समोर आल्यानंतर तात्काळ पालकमंत्र्यानी बॅंकेच्या मॅनेरज जवळ संपर्क साधून दोन कांऊन्टरवर नुकसानग्रस्तांना पैसे देण्याची व्यवस्था करावी असे सूचित केले त्यावेळी सर्वांना समाधान वाटले हा नेहमी भेडसावणारा प्रश्र्न सुटण्यास मदत झाली.यावेळी तालुक्यातील अनेक प्रश्नांवरती चर्चा होऊन ते सर्व प्रश्र्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे प्रयत्न केले जातील असे पालकमंत्र्यांनी सूचित केले.


 


आढावा बैठक केवळ फार्स


 


आढावा बैठक म्हणजे केवळ फार्स असल्याची भावना तळेवासियांची झाली आहे.कारण या आढावा बैठकांमध्ये तालुक्यातील अनेक प्रश्नांबाबतीत अधिकारी वर्ग अनुत्तरीत दिसले,तालुक्यातील विज समस्या सोडविण्यासाठी अधिकारी गांभीर्याने घेत नाही अडीच महीने झाले अजुनही अवस्था जैसे थे?महावितरण मांदाड येथे नवीन शाखा निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रस्तावा बाबत सकारात्मक उत्तर नाही?महागाव प्राथमिक आरोग्य केंद्र ईमारतीचे काम पुर्ण होऊन दीड वर्षे झाली ती धुळ खात पडली आहे पंधरा पदे मंजुर असताना एकही पद अजुन भरलेले नाही?मांदाड उपकेंद्राचे चक्रीवादळात पत्रे उडुन आज अडीच महीन्यांचा कालावधी लोटला ते बसवलेले नाहीत.विज आणि आरोग्य यांची सुविधा देण्यासाठी अधिकारी कामचुकारपणा करत असल्याचे निदर्शनास आले असल्याने आढावा बैठक म्हणजे केवळ फार्स असल्याची भावाना तळे तळेवासियांची झाली असल्याचे पहावयास मिळाले.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
पत्रकारांना हात लावाल तर याद राखा- डी.टी.आंबेगावे उदगीर येथे तालुका कार्यालयाचे शानदार उदघाटन
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image