प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मंत्रालय आणि विधीमंडळ प्रमुखपदी दैनिक बाळकडूचे मुंबई महानगर विभाग प्रमुख पंडित मोहिते-पाटील यांची निवड

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मंत्रालय आणि विधीमंडळ प्रमुखपदी दैनिक बाळकडूचे मुंबई महानगर विभाग प्रमुख पंडित मोहिते-पाटील यांची निवड


महाराष्ट्र २४ आवाज



 मुंबई प्रतिनिधी- (महेश कदम) प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या मंत्रालय आणि विधीमंडळ प्रमुखपदी दैनिक बाळकडूचे मुंबई महानगर प्रमुख पंडित मोतीराम मोहिते-पाटील यांची निवड करण्यात आली आहे. 


       पंडित मोहिते-पाटील यांना सन २०१३ पासून विविध वृत्तपत्रातील लिखाणाचा अनुभव असून "दै.बाळकडू" वृत्तपत्रात "मुंबई महानगर विभाग प्रतिनिधी" पदी, "नवकेसरी" वृत्तपत्रात "कार्यकारी संपादक" पदी, "दै.मराठवाडा केसरी" वृत्तपत्रात "मंत्रालय आणि विधिमंडळ प्रतिनिधी" पदी व हिंदी क्राईम "पोलीस नवरंग" साप्ताहिकात "उपसंपादक" पदी कार्यरत. त्याचप्रमाणे "सामना", "मामिॅक" व "अक्राॅस मुंबई" या वृत्तपत्रांसाठीही बातम्या व लेख, "दक्षता" मासिकातूनही क्राईम रिपोटीँग (स्टोरी) तसेच "आपला महाराष्ट्"' न्युज ('मुंबई महानगर प्रतिनिधी' पदी), "दखल न्युज भारत" चॅनल ('उपसंपादक' पदी), व "गर्जना" न्युज ('मुंबई विशेष प्रतिनिधी') पोर्टलच्या माध्यमातून निभीॅड पत्रकारितेतून एक वेगळी ओळख समाजात निर्माण केली. 


     त्याचप्रमाणे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, क्राईम, रोजगार अशा अनेक विषयांना वृत्तपत्रातून वाचा फोडण्याचे काम केले. मुंबई महानगरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या जनतेस पाणी, कचरा, शौचालय अशा समस्या संदर्भात आवाज उठवून सुख-सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून विशेष प्रयत्न केले. 


    ६ जानेवारी २०१८ रोजी 'पत्रकार दिनी' "जीवन गौरव" पुरस्काराने सन्मानित, मागील २०१९ या वर्षी 'मुंबई मराठी पत्रकार संघ' व 'आपला चौथा स्तंभ' यांच्या संयुक्त विद्यमानाने पत्रकारिता क्षेत्रात "कर्तृत्वाचा गौरव" करुन सन्मानपत्राने सन्मानित, असे अजून विविध पुरस्कार मिळाले आहेत. 


  सन २०१८-२०१९ या वर्षात 'मुंबई मराठी पत्रकार संघा'तून "पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम" पूर्ण केलेला आहे.


पंडित मोहिते-पाटील यांची संघटनेची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष मदत होणार आहे. ही निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व राज्य कार्यकारिणीच्या एकमताने ही निवड जाहीर करण्यात येत आहे .


पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !


 


 आंबेगावे डी.टी.


 संस्थापक अध्यक्ष


 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य


मो.9270559092 / 7499177411


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image