तळा तालुक्यातील कुडे येथे घरोघरी गणपतीचे आगमन
महाराष्ट्र २४ आवाज
कुडे,तळा (नितीन लोखंडे) गणपती बाप्पा मोरया.।।मंगलमुर्ती मोरया च्या जयघोषात दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुध्दा आज संर्पुण महाराष्ट्रात घरोघरी गणपतीची स्थापना करण्यात आली. तालुका तळा अंतर्गत गाव कुडे येथे सुध्दा गणरायाचे आगमन होताच विधी नुसार सकाळी घरोघरी प्रतीष्ठापना करण्यात आली. त्यामुळे एकूणच कुडे गावामध्ये तसेच आजुबाजूच्या परिसरामध्ये सर्वत्रच चोहीकडे मंगलमय तसेच आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. महाराष्ट्रातील अनेक सणांपैकी गौरी -गणपतीचा सण कोकणात मोठ्या उत्सवाने सारा केला जातो. गणपती निमित्ताने बाजारपेठ भरून सज्ज झाल्या आहेत. बाजारामध्ये साहित्य खरेदीसाठी सर्वत्र गणेशभक्तांची गर्दी पाहायला मिळते.
लोकांनी एकत्र येण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरूवात केली. गणेशोत्सवाच्या आगमणापासून ते विर्जन या कालावधीत गणपती सणा निमित्त एकमेकांच्या भेटी गाठी होऊन मुंबई वरून आलेल्या सभासद तसेच गावच्या स्थानिक सभासदांची गावाच्या विकासाच्या दुष्टीकोनातुन विचारांची देवान घेवाण होते. आठ दहा दिवसामध्ये नाच - गाणे - डांन्स यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रम करून गावात आनंद उत्सव साजरा केला जातो. तसेच समाज उपयोगी निर्णय घेतले जातात. परंपरेनुसार गणरायाची भक्ती भावाने पुजाअर्चा केली जाते.
कुडे गावामध्ये मुस्लीम समाज, मराठा समाज, बौध्द समाज, कुंभार समाज वर्षानुवर्षे गुण्या - गोविंदाने एकत्र राहत आहेत. व रूढी परंपरेनुसार आप-आपल्याला धर्माचे सण-उत्सव साजरे करतात. यामधून गावामध्ये एकात्मतेची नांदी दिसून येत आहे.
गणेशोत्सवाच्या इतिहासामध्ये जगावर आलेल्या महाभयंकर कोव्हीड19 या विषाणूच्या प्रार्दुभावामुळे महाराष्ट्रातील तमाम गणेशभक्तांना आर्थिक झळ बसत आहे.कोरोना या विषाणूचा प्रार्दुरभाव रोखून जगावर आलेले संकट दूर कर असे गणरायापुढे साकडे घालून शासनाच्या अटी व नियमांचे पालन करत या वर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करून शासनाला सहकार्य करू असा निर्णय घेण्यात आला.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य व रायगड जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व गणेशभक्तांना हार्दिक शुभेच्छा.