मुक्तरंग मोबाईल डायरीचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न
महाराष्ट्र २४ आवाज
प्रतिनिधी- महादेव महाजन
अहमदपूर : लातूर जिल्ह्यातील महत्वाचे दूरध्वनी व भ्रमणध्वनी नंबर असणारी वेळोवेळी कामाला पडणारी अडचणीच्या काळात उपयुक्त असणारी मुक्तरंग प्रकाशनाची मुक्तरंग मोबाईल संपर्क डायरीचे प्रकाशन माननीय आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
कार्यक्रमाच्या सुरुवातीस संयोजक दिनकर मध्ये वार यांनी आमदार बाबासाहेब पाटील व उपस्थित पत्रकाराचे स्वागत करून आपल्या प्रस्ताविकात मुक्तरंग मोबाईल डायरी चे हे वीसावे वर्ष असून अतिशय किचकट असणारे हे काम आमदार साहेब व सर्व जाहिरातदार याच्या बहुमोल सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे या सर्वाचा मी आभारी आहे.
यावेळी बोलताना बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की मुक्तरंग प्रकाशनाची मोबाइल डायरी ही प्रत्येकाच्या उपयोगी आहे डायरीचे मुख्य पृष्ठ आतील मांडणी खुप चांगल्या पद्धतीने करण्यात आली आहे विशेष म्हणजे आपल्या मोबाईल मध्ये हजारो नंबर असले तरी कधी कुठल्या नबरची गरज पडेल सांगता येत नाही अशा वेळी आपली आडचण ही डायरी सोडवते याच्यातो नंबर असतो महत्वाच्या वैक्ती अधिकारी ते वैद्यकीय सेवा सर्प मित्र ते घराची चावी हरवली इथ पर्यंत चे नबंर यात दिले आहेत खुप कठीण किचकट अस हे काम दिनकर मद्देवार आणि मुक्तरंग प्रकाशनाचे महारूद्र मंगनाळे जे आमच्या गावचे आहेत हा उपयुक्त उपक्रम वीस वर्षा पासुन चालवत आहेत हे कौतुकास्पद आहे .
मतदार संघाच्या विकासात सर्वाचे सहकार्य घेऊन सकारात्मक द्रष्टीकोन ठेवून आपण पुढे जाणार आहोत आपल्या कांहीं उपयुक्त सुचना असल्यास त्या जरूर सांगा सर्वाचे सहकार्य आहेच आधिकाधिक विकास आपणास करायचा आहे
या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वभर स्वामी बासिद पठाण राम तत्तापुरे रत्नाकर नळेगावकर गजानन भुसारे मेघराज गायकवाड महादेव महाजन शिवाजी गायकवाड अहमद तांबोळी सय्यद इलियास आदि उपस्थित होते