मुंबईच्या शाळेवरचे सुरक्षारक्षक तपसे चिंचोली ग्रामपंचायतीने दाखवले रोजगार हमी योजनेवर. जिल्हा परिषदेने चौकशीचे आदेश देऊनही औसा पंचायत समिती करते टाळाटाळ.

मुंबईच्या शाळेवरचे सुरक्षारक्षक तपसे चिंचोली ग्रामपंचायतीने दाखवले रोजगार हमी योजनेवर. 


जिल्हा परिषदेने चौकशीचे आदेश देऊनही औसा पंचायत समिती करते टाळाटाळ.  


महाराष्ट्र २४ आवाज


{ व्यंकटराव पनाळे, जिल्हा प्रतिनिधी } 


लातुर : दि. २२ - औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथील रोजगार हमीच्या कामावर चक्क मुंबईच्या शाळेवर कार्यरत असणारे सुरक्षारक्षकास दाखवून भ्रष्टाचाराचा कळसच गाठला. या प्रकरणातील तक्रारीच्या चौकशीला साडेपाच महिन्या पासून औसा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना मुहूर्तच सापडेना.



औसा पंचायत समितीला जिल्हा परिषेदेचे चौकशीसाठी पत्र आले असताना पंचायत समिती औसा कडून कसलीच कार्यवाही झालेली नाही. रोजगार हमीच्या चौकशी साठी प्रतिसाद ही दिलेला दिसत नाही.


तपसे चिंचोली येथील रहिवासी असलेले लक्ष्मण कांबळे प्रत्यक्षात मुंबई येथे २०१४ ला एका शाळेवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. हे तक्रारदार २०१४ साली तपसे चिंचोली येथे गावात वास्तव्यास नसताना ग्रामपंचायतने २०१४ वर्षीच्या रोजगार हमी योजनेच्या कामावरच चक्क मजूर म्हणून दाखवले आहे. तक्रारदाराने पंचायत समिती औसा गटविकास अधिकारी याना दि. १२ सप्टेंबर २०१९ रोजी तक्रारी अर्ज दिला होता मात्र औसा पंचायत समितीने या अर्जाकडे पूर्णतः डोळेझाक करून यावर कसलीच चौकशी केली नाही. म्हणुन तपसे चिंचोली येथील तक्रारदार कांबळे यांनी लातुर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दि. २३ जानेवारी २०२० रोजी लेखी तक्रार देवुन यात झालेल्या भ्रष्टाचाराची सविस्तर अशी माहिती दिली. त्या अर्जाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदने औसा पंचायत समिती चे गटविकास अधिकारी यांना कार्यवाही करण्याचे व तात्काळ अनुपालन अहवाल कळवण्याचे आदेश दिले. मात्र गटविकास अधिकारी यांनी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मादळे ए.व्हि. यांची या प्रकरणात चौकशी कामी नियुक्ती करुन या पत्रात लक्ष्मण कांबळे याच्या तक्रारीची सखोल अशी चौकशी करून अहवाल सात दिवसाच्या आत आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायसह सादर करण्यात यावा. सदरील कामी विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी. विलंबनाची जबाबदारी आपणावर राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी. असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. २२ फेब्रुवारी २०२० ला हे पत्र तक्रारदार लक्ष्मण कांबळे यांना पण दि. ४ मार्च २०२० रोजी टपाला द्वारे मिळाले आहे. तेव्हा पासून आज पर्यंत साडेपाच महिने होऊन गेले तरी कसल्याच प्रकारची चौकशी विस्तार अधिकारी मादळे यांनी गावात येऊन केलेली नाही. त्यामुळे आज जवळजवळ साडेपाच महिने उलटूनही तपसे चिंचोली येथील रोजगार हमीच्या कामाची चौकशी आजून ही गुलदस्त्यातच आहे. असा ठपका भिम आर्मी संघटनेचे जिल्हा महासचिव लक्ष्मण कांबळे यांनी औसा पंचायत समितीवर ठेवला आहे. 



या झालेल्या भ्रष्टाचारास कोण पाठराखण देत आहे ? जिल्हा परिषदेच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि चौकशी कामी नेमलेल्या विस्तार अधिकारी यांच्यावर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल काय कार्यवाही करणार ? जिल्हा परिषदेचे तरुण तडफदार अध्यक्ष राहुलजी केंद्रे या प्रकरणी लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image