प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने पोलीस निरीक्षक मारोती खेडकर कोविड योद्धा ने सन्मानित
महाराष्ट्र २४ आवाज
जालना : प्रतिनिधी-भगवान धनगे
जगभरामध्ये धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना महामारीच्या या संकट काळामध्ये बदनापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये कायदा-सुव्यवस्था, संचारबंदी, लॉक डाऊन बाबत कडक भूमिका घेऊन कोरोना महामारीच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे बदनापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्ह्याच्या वतीने कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वसामान्यांच्या मनात त्यांनी आपल्या कार्याची वेगळी छाप सोडली आहे. या काळामध्ये त्यांनी रात्रंदिवस लॉक डाऊन व संचारबंदीच्या नियमाचे कडक पणाने अमलबजावण्यासाठी जागता पहारा देऊन प्रसंगी संचारबंदी व लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यावर कायद्याचा बडगा उगारला जात होता. बदनापूर पोलीस स्टेशन क्षेत्रांमध्ये ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्या ठिकाणी कॉन्टॅटमेंट झोनची कडक अंमलबजावणी करून सर्वसामान्यांना नाहक त्रास होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली. वेळोवळी कोरोना बाबत अफवा व चुकीची माहिती पसरविण्याऱ्याबाबत त्यांनी सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण केली. या काळामध्ये सर्वसामान्यांना भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूची, इतर आजारपणा बाबत हॉस्पिटल सेवा सुरू राहण्याबाबत कसल्याही प्रकारची गैरसोय होऊ दिली नाही. याबाबत कायदेशीर आणि नियमानुसार उत्कृष्ट नियोजन खेडकर यांनी केले होते.
त्यांच्या उत्कृष्ट, कार्यतत्पर कामगिरीची दखल प्रेस,संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाच्या जालना जिल्हा शाखेच्या वतीने पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांना कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जालना जिल्हाध्यक्ष भगवान धनगे, उपाध्यक्ष तनवीर बागवान, सदस्य जगन्नाथ जाधव, मराठवाडा साथी बदनापूर तालुका प्रतिनिधी किशोर शिरसाठ आदी पदाधिकारी उपस्थित होते.