देहविक्री करणाऱ्या मुली व तृतीय पंथीना एक महिन्याचे रेशन वाटप.
महाराष्ट्र २४ आवाज
( श्रीकांत नांदगावकर)
मुंबई : कोरोना विषाणू व लॉकडाऊन काळात नागरिकांचे काम बंद होऊन अनेकांना घरी बसण्याची वेळ आली. अशा नागरिकांना अनेक सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी अन्नधान्याची पूर्तता करून मदतीचा हात दिला. मात्र सामाजिक कार्यकर्ते कृष्णा महाडिक यांनी कामाठी पुरा येथील देहविक्री करणाऱ्या २२ मुलींना गुरुनानी सती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून व गोरेगांव येथील २० तृतीय पंथीना सूर्यादय फाऊंडेशन यांच्या माध्यमातून एक महिन्याचे रेशन वाटप करण्यात आले. लॉकडाऊनमुळे या सर्वांवर उपासमारीची वेळ आली होती. आजपर्यंत कोणीही आमच्या मदतीसाठी उभे राहिले नाही मात्र तुम्ही पहिले व्यक्ती आहात जे आमची व्यथा समजून आमच्या मदतीसाठी धावून आलात असे समाधानाचे उद्गार कामाठी पुरातील मुलींनी महाडिक यांच्याजवळ काढले.
प्रतिक्रिया.
कामाठी पुरातील देहविक्री करणाऱ्या मुलींची व्यथा ऐकुन व पाहुन मी थक्क झालो जगातील कोणत्याही स्त्रीवर (आई बहिणीवर) पोटाची खळगी भरण्यासाठी ही वेळ येऊ नये.आपण इतर घटकांना ज्याप्रमाणे मदत करतो त्याचप्रमाणे यांनाही मदतीचा हात देणे गरजेचे आहे.
(श्री कृष्णा महाडिक सामाजिक कार्यकर्ते)