तळा तालुक्यातील कुडे येथे बाप्पाचे साधेपणाने विसर्जन
महाराष्ट्र २४ आवाज
कुडे,तळा( नितीन लोखंडे) गणपती बाप्पा मोरया ...। पुढच्या वर्षी लवकर या..। या जयघोशात आज कुडे येथे संध्याकाळी गणपतींचे व गौरींचे सामुहिकरित्या विसर्जन करण्यात आले. गेले सात दिवस गणरायाची भक्ती भावाने पुजा-अर्चा करून गणपती बाप्पा ला साकडे घालण्यात आले. आणि आज संध्याकाळ च्या सुमारास अरबी समुद्राला लागुन असलेल्या कुडे येथील खाडी शेजारी असलेल्या तलावामध्ये विधी प्रमाणे पुजा करून गणरायाचे अखेरचे दर्शन घेऊन बाप्पा मोरया... बाप्पा मोरया....या मंत्रमुद्ध स्वरात गणरायाचे विसर्जन करण्यात आले. कोरोणाच्या संकटामुळे दरवर्षी च्या तुलनेत या वर्षी अत्यंत साधेपणाने विर्सजन करण्यात आले. गणरायाचे विसर्जन करताना कुडे येथील सर्व ग्रामस्थ पुरूष , महीला मंडळ, तरूण मंडळी अत्यंत दु:खी झाले होते...भाऊक झाले होते. बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी गावामधील सर्व ग्रामस्थ , महिला तसेच तरूण मंडळी, लहान मुले यांनी हजेरी लावली होती.