पोळा साजरा होणार घरोघरी आणि करावी लागणार मातीच्या बैलांची पूजा कित्तेक दशकात पोळा रद्द झाल्याचे दाखले नाहीत शेतकरी स्वयमस्पुर्तीने साजरा करतात हा सन शेतकरी मित्राचा असतो हा सन्मान दिवस

पोळा साजरा होणार घरोघरी आणि करावी लागणार मातीच्या बैलांची पूजा


कित्तेक दशकात पोळा रद्द झाल्याचे दाखले नाहीत


शेतकरी स्वयमस्पुर्तीने साजरा करतात हा सन


शेतकरी मित्राचा असतो हा सन्मान दिवस


महाराष्ट्र २४ आवाज



जिल्हा प्रतिनिधि- गजानन हुरपडे


अमरावती : कोरोना महामारीचा पोळ्यासाठी संदेश बैलांचे रक्षण न झाल्यास मातीच्या बैलाचे पूजन करावे लागणार. त्यामुळे आता गोवंशाचे रक्षण अत्यावश्यक. कोरोना महामारीने हे फक्त उदा. देऊन सचेत करण्याचा प्रयत्न केला.



अंजनगाव सुर्जी येथील पारंपरिक काठीच्या यात्रेचे पाच शेवटचा सोमवार बाजार त्यानंतर पोळ्याची यात्रा पाणअटाई पोळा चौक काठीपुरा, सुर्जी येथील द्वारका चौक अशा प्रकारे बैलांचा पोळा भरतो. त्यात उत्कृष्ट सजावट असणाऱ्या बैलांना पारितोषिक देखील दिल्या जातात त्या निमित्ताने बाजार भारतात. काठीच्या यात्रेतील व्यापारी प्रत्येक ठिकाणी खेळणी, फुगे, लाकडी साहित्य, लोखंडी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने लावतात. शहरातील सुमारे दोन हजाराचे आसपास बैलजोडया पोळ्यात सहभागी होतात. त्यानंतर कावड घेऊन महादेवाला जाऊन आणलेले तीर्थ त्या पोळ्यात आलेल्या बैलांच्या डोक्यावर टाकल्या जाते. महादेवाचे गाणे म्हणत मोठ्या आनंदाने त्या संपूर्ण पोळ्यात ते शिवभक्त महादेवाचे गाणे म्हणतं फिरतात. आणि सरते शेवटी तोरण तोडतात.



तेथून पोळा फुटला असे म्हणतात ते त्या बैलांना देखील समझते आणि सुसाट वेगात ते बैल आपल्या घरी पूजन करून घेण्यासाठी जातात. तिथे त्या बैलांचे औक्षावन केल्या जाते. ठोंबरा खाऊ घातल्या जातो. हातातली राखी त्या बैलांच्या डोक्यावर टाकली जाते अशा प्रकारे मोठ्या गुण्या गोविंदाने हा परंपरागत सन साजरा केल्या जातो. कित्तेक वर्षांपासून अखंडित चालत आलेला हा उत्सव हिंदू आणि मुस्लिम शेतकरी साजरा करताना दिसतात. कित्तेक शेतकरीतर आपल्या घरा पासून ते पोळ्या मैदाना पर्येंत वाजत गाजत त्या बैलांना नेतात. अत्यंत उत्साहाचे वातावरणात अनेक शतका पासून सुरु असलेला हा उत्सव ह्या वर्षी फक्त कोरोना महामारी मुळे रद्द झाला.



आता यावर्षी घरातच पोळा सन साजरा करावा लागणार असून मातीच्या बैलांची पुज्या करावी लागणार आहे. "पोळ्याचा बैल आला" असे सुखदायी स्वर यावर्षी ऐकू येणार नाहीत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा होईल व लहान लहान मुले मातीचा, लाकडी बैल घेऊन ओळखीच्या लोकांच्या घरी जाऊन पोळ्याचा बैल आला म्हणून आपले बक्षीस चॉकलेट, बिस्कीट, गोळ्या अथवा पैसे जमा करतील. मात्र त्या पैशातून ते खेळणे विकत घेऊ नाहीत. त्यामुळे बालमनावर ह्या दृष्ट कोरोनाने विरझन टाकल्या सारखं झाल्याचे दिसते. 



***********************************


द्वारकेच्या यात्रेवर देखील कोरोना महामारीचे सावट.....


सुर्जी अंजनगाव येथील द्वारका चौकात भरणारे द्वारकेची यात्रा यावर्षी कोव्हीड १९ च्या वाढत्या दुष्प्रभावमुळे यावर्षी रद्द झाली. पोळ्याचे दिवशी अंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात बैलपोळा साजरा होत असला तरी देखील नंदिबैलांची पूजन पोळ्याचे दुसऱ्या दिवशी सुर्जी मधील विशेष आकर्षन आहे. मनाच्या नंदी म्हणून नवले परिवार अकोटकर परिवार व बोरोडे परिवार याचे नंदीला मान आहे. पूर्वानु काळा पासून गावातील देशपांडे परिवार त्या मनाच्या नंदीचे पूजन व आरती घरी जाऊन करतात. त्या नंतर तो नंदी यात्रेत जातो. पोळ्याचे दिवसापासून त्या नंदीचा साज तय्यार केल्या जातो. रात्रभर जागून झूल व त्या नंदीचे बाशिंग बनविल्या जाते. मानाचा नंदी सजविण्यात येणाऱ्या परिवाराचे सहकार्य त्या भागात राहणारे आजूबाजूचे लोक करतात. शिंदी वृक्षाचे पाणांपासून तय्यार केलेली झूल व मुखवटा यात्रेचे मुख्य आकर्षण असते. मानाचा नंदी सजविणाऱ्या परिवारा कडून महाप्रसाद म्हणून भोजन देखील दिल्या जाते. देशपांडे कुटुंबीय त्या मनाच्या नंदीस गढीच्या मुख्य दरवाज्यावर नेतात व त्यांचे पूजन करतात. त्या नंतर ढोलाचे भजन मंडळ वाजत गाजत त्या नंदीस हनुमानाचे दर्शनास नेतात. त्यानंतर ज्वाला चौकात काल्याचे कीर्तनाने त्या नंदिकेश्वराची द्वारका यात्रा समाप्त होते. सुर्जी अंजनगाव व संपूर्ण पंचकृषीतील नागरिक पूजा करून त्या नंदीला नारळ अर्पण करतात. पूर्वानु काळा पासून चालत आलेली ही परंपरा यावर्षी मात्र कोरोना महामारी मुळे रद्द झाली. ज्यामुळे संपूर्ण पंचकृषील त्या द्वारकेच्या यात्रेची चर्चा ऐकू येत आहे.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image