तळा तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाची १७ कोटी ४४ लाख ९९ हजार ७७ रुपये नुकसान भरपाई लाभार्थीचें खात्यात जमा
तहसिलदार ए.एम.कनशेट्टी यांचे नियोजनबद्ध कामगिरीमुळे नागरिकांत समाधान
महाराष्ट्र २४ आवाज
तळा (कृष्णा भोसले )तळा तालुक्यात ३ जून २०२० रोजी झालेल्या चक्रीवादळाच्या तडाख्याने तालुक्यातील घराकौलांचे, बागायती शेती यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.या सर्व बाबींचा शासनाने विचार केला व तळा तालुक्यातील नागरिकांच्या नुकसानीचा सकारात्मक विचार करून शासनाने दिलेल्या नुकसान भरपाई अनुदान आजतागायत १७कोटी ४४लाख ९९हजार ७७रूपये लाभार्थी चें
खात्यात जमा झाल्याची माहिती निवासी नायब तहसिलदार परमेश्वर खरोडे यांनी दिली आहे.
आधीच कोरोनाने संपूर्ण देशात थैमान घातले होते.त्यातच हा भंयकर असा चक्रि वादळ आला वादळाच्या तडाख्याने गावातील घरे दारे, छपरे कौले विजेचे खांब,,शाळा , अंगणवाडी, स्मशानभुमी, शेती यांचे प्रचंड नुकसान झाले या परीस्थीतीचा आढावा घेण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती रायगड तथा जिल्हाधिकारी रायगड यांचे येताच तळा तालुक्याचे कर्तव्य दक्ष तहसिलदार ए.एम.कनशेट्टी यांनी सर्व खात्याचे अधिकारी, कर्मचारी यांची बैठक घेऊन तातडीने परिस्थितीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.सकळी ज्या भागात गावरस्ते आडले होते ते बुलडोझर घेऊन साफ करण्याचे पाहीले काम केले.
तालुक्यातील कृषी सहाय्यक, ग्रामसेवक,तलाठी ,शिक्षक ,यांचे मदतीने गावागावात जाऊन प्रत्यक्ष नुकसानीचे पंचनामे करून घेतले.सदरची माहिती शासनाला सादर करण्यात आली. नुकसानीचा अंदाज मिळताच शासनाकडून निधी प्राप्त झाला.पण तालुक्यात विजपुरवठा खंडीत असल्याने काम करणे शक्य नव्हते. याचा विचार करून तळा तहसिलदार यांनी तातडीने जनरेटर मागवुन या कामातील तांत्रिक अडचणी दुर करुन सर्व कर्मचारी कामाला लागले. सगंणक प्रणाली असल्याने सर्व कर्मचारी या जनरेटरचा उपभोग घेत आपल्या कामाला लागले.गावागावातील नुकसानीचे वर्गिकरण करून याद्या फायनल करण्यात आल्या.
तालुक्यातील सर्व गावांचे पंचनामे झाले.या सर्व बाबींवर मार्गदर्शन करत नुकसान ग्रस्त ,आपतग्रस्त नागरिकांना वेळेत मदत पुरविणे ही बाब महत्त्वपूर्ण असल्याने या बाबींवर अधिक अधिक लक्ष देत सर्व कर्मचारी वर्गाच्या मदतीने काम मोठ्या जोमाने सुरू झाले. ती मदत पोहचविण्यात कामगिरी मोलाची ठरली.
लोकांना अधिक अधिक लवकर त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी तहसिलदार कार्यालय यांचे
कडुन रककम वर्ग करण्यात आले.यासाठी कर्मचारी वर्गाकडून वेळेवर काम करुन घेण्यासाठी तहसिलदार जातीने लक्ष देत होते . त्यामुळे अवघ्या काही दिवसांत नागरिकांच्या खात्यात पैसे जमा झाले गेले.यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
तालुक्यात एकुण ६५गावे असुन सर्व गावातुन पंचनामे झाले आहेत.घरे ,गोठे, झोपड्या यासाठी ,अनुदान वाटप झालेल्या लाभार्थी संख्या १२०४६ असुन यासाठी अनुदान वाटप झालेली रक्कम १५ कोटी ६२लाख ५२ हजार ००३ रुपये एवढी आहे.
दुकान टपरी धारकांना २६लाभार्थीना २ लाख ५५ हजार ,५१ रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे.
तालुक्यातील ३जखमी व्यक्तींना रोख भत्ता १२ हजार ९०० रुपये वाटप करण्यात आले आहे. स्थलांतरित १ लाभार्थी साठी३६ हजार ६७५ रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे. मृत जनावरे १अनुदान वाटप २५ हजार रूपये करण्यात आले आहे. त्याचबरोबर शेती नुकसान अनुदान वाटप लाभार्थी संख्या २१०८ असुन त्यासाठी अनुदान वाटप १ कोटी ७९ लाख १७ हजार ४४८ रुपये झाले आहे.
त्यामुळे तालुक्यातील एकुण अनुदान वाटपाची रक्कम १७ कोटी ४४ लाख ९९ हजार ७७ रुपये एवढी रक्कम तालुक्यातील नुकसान भरपाई आपतग्रस्त नागरिकांना कमीत कमी वेळात प्राप्त झाली आहे.कोविड १९ व निसर्ग वादळाच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.तालुक्यातील विजेचा लपंडाव, नेटवर्क प्राब्लेम या कारणाने बॅंक ऑफ इंडिया तळा शाखेत कित्येक दिवस रांगांच्या रांगा असल्याने नागरिकांना रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याचे दिसून येत आहे.
तळा तहसिल कार्यालयातील माहीतीनुसार नागरिकांची नुकसान भरपाई अनुदान बॅंकेकडे वर्ग करण्यात आलेली आहे.ज्यांचे पंचनामे झाले आहेत.परंतु बॅंक पासबुक आधार कार्ड नंबर यात काही तांत्रिक चुकीमुळे रक्कम जमा झाली नसल्यास
महसुल विभागात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.